विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा सध्या एका मिशन मोडवर असल्याचे चित्र आहे… गेल्या चार दिवसांपासून ते व्हिडिओ काॅन्फरन्स सुविधा किंवा स्काइप पासून क्षणभर सुद्धा हटलेले दिसत नाहीत. साडे तीन लाख कार्यकर्त्यांशी ते बोलले आहेत… राष्ट्रीय पदाधिकारयांशी ते दररोज बोलत आहेत.
मिशन एकच! एक कोटी कार्यकर्त्यांच्या माध्यमांतून दररोज पाच कोटी फूड पॅकेटस गरीब व गरजूंपर्यंत पोहोचविणे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय लाॅकडाऊन जाहीर केल्याच्या क्षणापासून नड्डा अव्याहतपणे कार्यकर्त्यांशी बोलत आहेत. पहिल्यांदा ते उत्तर भारतातील, नंतर दक्षिण भारतातील कार्यकर्त्यांशी बोलले. नंतर प्रदेशाध्यक्ष, सगळे खासदार, सगळे आमदार, प्रदेश पदाधिकारी यांच्याशी त्यांनी संवाद साधला.
Interacted with BJP leaders of West Bengal,Karnataka,Andhra & Tamil Nadu.
— Jagat Prakash Nadda (@JPNadda) March 28, 2020
The world is facing difficult times & so is our country. Our PM Shri @narendramodi is leading from the front. Happy to note that Karnataka govt & our party is fighting in an aggressive manner with Covid-19. pic.twitter.com/3eOTN5ezZq
त्यांनी प्रत्येक एका राष्ट्रीय पदाधिकारयांकडे एकेका राज्याची जबाबदारी दिलीय. तसेच केंद्र सरकारने ही प्रत्येक मंत्र्याकडे एकेक राज्य सोपविले आहे. त्याचबरोबर प्रत्येक जिल्ह्यातील समन्वयाची जबाबदारी एका प्रमुख कार्यकर्त्याकडे सोपविली आहे. शहरी विधानसभा मतदारसंघामध्ये दररोज सरासरी ६ ते ७ हजार फूड पॅकेटस, तर ग्रामीण मतदारसंघामध्ये सरासरी चार हजार पॅकेटस द्यावेत, असे निर्देश त्यांनी दिले आहेत. या कामाचा ते दररोज सायंकाळी राष्ट्रीय पदाधिकारी बैठकीत आढावा घेत आहेत. राष्ट्रीय संघटन महामंत्री बी.एल. संतोष यांच्या मदतीने त्यांनी लाखो कार्यकर्त्यांना कोरोनाच्या आपत्तीमध्ये सक्रिय केले आहे.
मोदी आणि अमित शहा यांच्या सावलीत वाढलेले नड्डा हे आता स्वतःचा ठसा हळूहळू उमटवित असल्याचे चित्र आहे.