• Download App
    दोघा तिघांच्या कारस्थानामुळे शिवसेना सोडली; नारायण राणे यांचा गौप्यस्फोट | The Focus India

    दोघा तिघांच्या कारस्थानामुळे शिवसेना सोडली; नारायण राणे यांचा गौप्यस्फोट

    शिवसेनेचे अनेकजण माझ्या बाजूने होते. दोघा-तिघांच्या कारस्थानामुळेच शिवसेना सोडली असे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी सांगितले.


    विशेष प्रतिनिधी

    पुणे : शिवसेनेचे अनेकजण माझ्या बाजूने होते. दोघा-तिघांच्या कारस्थानामुळेच शिवसेना सोडली असे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी सांगितले.

    एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राणे बोलत होते. अत्यंत प्रांजळपणे त्यांनी शिवसेना आणि काँग्रेस सोडल्याचा प्रवास कथन केला.

    राणे म्हणाले, शिवसेनेतले अनेक लोक माझ्या बाजूने होते. ठराविक दोघे-तिघेच असे होते, ज्यांनी माझ्याविषयी बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे मत कलुषित केलं.मी मुख्यमंत्री झाल्यानंतर काही नेते हे बाळासाहेब ठाकरे यांचे कान भरु लागले. कारस्थाने करू लागली. शिवसेना सोडेन असे मला कधीही वाटलं नव्हते. ठाकरे कुटूंबाबद्दल किंवा कोणत्याही ठाकरेंबद्दल माझ्या मनात आकस नाही. मी जो कोणी आहे, तो आज केवळ शिवसेेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याच मुळे आहे. काँग्रेसने मला मुख्यमंत्रीपदाचा शब्द देवून तो पाळला नाही; तरीही पक्षाध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याबद्दल माझ्या मनात कटुता नाही.

    राणे म्हणाले, “शिवसेनेतले अनेक लोक माझ्या बाजूने होते. ठराविक दोघे-तिघेच असे होते. ज्यांनी माझ्याविषयी बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे मत कलुषित केलं. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर काही नेते हे बाळासाहेब ठाकरे यांचे कान भरु लागले. माझ्याबद्दल मन दुषित करण्याचं काम झालं. बाळासाहेबांकडून याबाबत विचारणाही होत नव्हती. त्यानंतर मी बाळासाहेबांना सहा पानी पत्र लिहिलं होतं.

    मी त्यावेळी दहा ते बारा दिवस अमेरिकेला गेलो होतो. त्यानंतर परत आलो. त्यावेळी १२ दिवसांमध्ये काय काय कट-कारस्थानं झाली ते समजलं. माझ्या पत्रकार मित्रांनी मला अनेक गोष्टी सांगितल्या. त्यानंतर मी बाळासाहेब ठाकरेंना भेटलो. त्यांना भेटून आश्वासन दिलं की मी राजकारण सोडतो. मी कोणत्याही पक्षात जाणार नाही. राजकारणात जाणार नाही, असंही सांगितलं होतं.मात्र बाळासाहेब ठाकरे यांनी काही लोकांना बोलावलं आमचं बोलणं झालं. सगळं काही स्पष्ट झालं.मात्र काही दिवसांनी पुन्हा कारस्थानं होऊ लागली.त्यामुळे मी राजीनामा देण्याचं नक्की केलं.”

    Related posts

    सरकारमध्ये राहून अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या “डबल गेमा”; सिंहस्थ कुंभमेळा आयोजनात वेगवेगळ्या मार्गांनी अडथळे!!

    संघाने सगळ्या संस्था ताब्यात घेतल्या इथपासून ते मोदींनी स्वतःच्या मर्जीतलेच निवडणूक आयुक्त नेमले, इथपर्यंत राहुल गांधींच्या आरोपांच्या फैरी!!

    वंदे मातरमच्या मुद्द्यावरून एकट्या नेहरूंचीच का बदनामी करता??; पण मल्लिकार्जुन खर्गेंनी‌ राज्यसभेत सवाल करून नेमके केले काय??