विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोविड १९ च्या फैलावाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवांच्या वाहतुकीसाठी विलंब होऊ नये म्हणून देशभरातील राष्ट्रीय महामार्गांवरील टोलवसूली तात्पुरती थांबवली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली.
अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या व्यक्ती, वस्तूंच्या वाहतुकीची परवानगी देण्यात आली आहे. सामान्य वाहनांना परवानगी नाही, असेही गडकरी यांनी ट्विटमध्ये स्पष्ट केले आहे.