• Download App
    देशभर कोरोना फैलावूनही तबलिग जमातची मस्ती कायम; म्हणाले "माफी मागणार नाही" | The Focus India

    देशभर कोरोना फैलावूनही तबलिग जमातची मस्ती कायम; म्हणाले “माफी मागणार नाही”

    विशेष  प्रतिनिधी

    नवी दिल्ली : देशभर कोरोना फैलावूनही निजामुद्दीन तबलिगी जमातची मस्ती कायम आहे. देशाची माफी मागण्या ऐवजी तबलिगचा प्रवक्ता शेख मुजीबूर रहमान केंद्र सरकारवरच दुगाण्या झोडायला लागला आहे. संपूर्ण देश तबलिगमुळे कोरोनाच्या संकटात सापडला असताना तबलिग जबाबदारी झटकत आहेच, पण सरकारने तयारी केल्याशिवाय लॉकडाऊन केले, असा आरोप केला. तबलिगच्या समर्थनासाठी अन्य काही मुस्लीम संघटनाही पुढे आल्या. यात पीएफआयचे डॉ. अकील खानही सामील झाले.  कोरोना फैलावाला तबलिगी जमात जबाबदार नसल्याचाही दावा करण्यात येत आहे.

    •  १५४८ लोकांनी मरकजमध्ये सहभाग घेतला. त्यांना बाहेर काढण्यात आले.
    •  २४ लोक कोरोना पॉझिटिव्ह, ४४१ लोकांना कोरोना सारखी लक्षणे
    • नायब राज्यपाल लवकरच एफआयआर दाखल करण्याचे आदेश देतील. “तबलिगी जमातने संपूर्ण देशाची माफी मागितली पाहिजे. त्यांनी चूक केली आहे.” : डॉ. वली,
    •  दिल्ली पोलिस, एअरपोर्ट अँथॉरिटी यांचीही चौकशी झाली पाहिजे.
    •  प्रशासनाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह.
    •  धार्मिक कार्यक्रमाची जबाबदारी तबलिग जमातचीच आहे.
    •  दिल्ली पोलिसांनी मरकजमधील धार्मिक कार्यक्रमाला परवानगी दिली नव्हती.
    • तबलिग जमातच्या उलट्या बोंबा, देशाची माफी मागण्या ऐवजी तबलिग जमातचे प्रवक्ते शेख मुजीबूर रहमान यांचे सरकारवर बिनबुडाचे आरोप. म्हणतात, “सरकारच कोरोनावर नियंत्रण ठेवू शकले नाही.”

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…