तबलिग जमातीच्या सदस्यांच्या माध्यमातून देशभरात कोरोना पसरवित मुस्लिम समाजातील लोकांना मशीदींमध्ये जाणे आवश्यकच आहे, असे सांगणारा तबलिगी जमात मरकझचा अमीर मौलाना सादला उपरती झालीआहे. डॉक्टरांकडे जाणे शरियतविरुध्द नाही. यापुढे कोठेही मजमा लावू नये म्हणजे गर्दी करू नये, असे आवाहन त्याने केले आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : तबलिग जमातीच्या सदस्यांच्या माध्यमातून देशभरात कोरोना पसरवित मुस्लिम समाजातील लोकांना मशीदींमध्ये जाणे आवश्यकच आहे, असे सांगणारा तबलिगी जमात मरकझचा अमीर मौलाना सादला उपरती झाली आहे. डॉक्टरांकडे जाणे शरियतविरुध्द नाही. यापुढे कोठेही मजमा लावू नये म्हणजे गर्दी करू नये, असे आवाहन त्याने केले आहे.
‘तबलीगी जमात’च्या ‘मकरझ’मध्ये उपस्थितांना ‘मरण्यासाठी मशिदीपेक्षा चांगली जागा नाही’ असे सांगणारा मौलाना सादचा आॅडीओ व्हायरल झाला होता.
कोणतेही संकट आल्यावर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा मशीदींकडे पळायला हवे. मशीदींमध्ये जमा झाल्याने आजार होतो ही गैरसमजूत आहे. जर तुम्हाला वाटतच असेल की मशीदींमध्ये आपण एकत्र जमा झाल्यावर मरू तर मरण्यासाठी मशीदीसारखी पवित्र जागा कोणतीही नाही. जर कोणी म्हणत असेल की मशीदी बंद केल्या नाहीत तर साथ आणखी वाढेल तर ही गोष्ट मनातून पहिल्यांदा काढून टाका. उलट लोकांना समजून सांगा की जर मशीदींमध्ये आपण गेला नाही तर आजार आणखी वाढेल. अल्लाहच्या हुकूमाविरुध्द ही गोेष्ट असेल. अल्लाने सांगितले आहे की कोणतेही संकट आल्यावर मशीदींमध्ये जमा व्हायला हवे. त्यामुळे कितीही भयंकर साथ येऊ देत मशीद बंद करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
एका क्लिपमध्ये मौलाना ‘मै ही अमीर हूॅ…सबका अमीर…आप नहीं मानते तो भाड में जाईए,’ असेही म्हणले होते. अल्लाहवर विश्वास ठेवा. कुराण वाचत नाहीत आणि वर्तमानपत्रं वाचतात आणि घाबरून पळत सुटतात… अल्लाह यासाठीच काहीतरी अडचणी निर्माण करतो, कारण त्याला पाहायचं असतं की अशा परिस्थितीत माझा बंदा काय करतो? असे मौलाना साद याने म्हटले होते.
मात्र, आता त्याने पुन्हा एक आॅडिओ क्लिप पाठविली आहे. त्यामध्ये त्याने आपण करोना विषाणू संसर्गाच्या भीतीनं क्वारंटाईन झाल्याचे सांगितले आहे. दिल्लीत डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर आपण आयसोलेशनमध्ये आहे असे सांगत तबलीगी जमातच्या कार्यकर्त्यांना ‘डॉक्टरांकडे जाणं हे शरियतविरुद्ध नाही’ असे समजावतदेखील आहेत. याअगोदर मात्र साद ‘जो डॉक्टर अल्लाहवर विश्वास ठेवतो त्याचाच सल्ला मानावा’ असे म्हणाला होता. तबलीगी जमातचे अध्यक्ष मौलाना साद यांचा हा आॅडिओ दिल्ली मरकझच्या यूट्यूब पेजवरून जाहीर करण्यात आलाय.
गुरुवारी सकाळी जारी करण्यात आलेल्या संदेशात ‘जमातच्या कार्यकर्त्यांनी सरकारला पूर्ण मदत करायला हवी. डॉक्टरांचा सल्लाही घ्यायला हवा’ असं मौलाना साद म्हणत आहेत. त्यासोबतच यापुढे कुठेही ‘मजमा’ लावण्यात येऊ नये, असेही त्यांनी बजावले आहे.
तबलीगी जमातचे अनेक क्वारंटाईन करण्यात आलेले लोक डॉक्टरांना सहकार्य करत नाही. पोलीसांवर हल्ले करण्याचे प्रकारही घडले होते. काही जण तर पाणी पिऊन पोलीसांवर थुंकले. त्यामुळे, मौलाना साद यांनी आपल्या आॅडिओमध्ये डॉक्टरांच्या सूचना पाळण्याचा संदेश दिला आहे. सोबतच हे शरीयतच्या विरुद्ध नसल्याचंही त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सांगितलंय.
उल्लेखनीय म्हणजे, आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, तबलीगी जमातच्या ‘मरकझ’मध्ये सहभागी झालेल्या ९००० जणांची ओळख पटवण्यात आलीय. त्यापैकी १३०६ परदेशी नागरिक आहेत तर उरलेले भारतीय आहेत. सरकारने तबलिगी जमातच्या ९६० परदेशी नागरिकांचा व्हिसा रद्द केला आहे. दिल्लीत जवळपास २००० तबलीगी जमातचे सदस्य आढळले होते त्यापैंकी १८०४ जणांना क्वारंटाईन करण्यात आलंय तर ३३४ जणांना वेगवेगळ्या रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे.