• Download App
    दिल्ली दंगली प्रकरणी उमर खालिद विरोधात गुन्हा; जामियाचे दोन विद्यार्थी नेतेही सामील | The Focus India

    दिल्ली दंगली प्रकरणी उमर खालिद विरोधात गुन्हा; जामियाचे दोन विद्यार्थी नेतेही सामील

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : ईशान्य दिल्लीतील दंगली प्रकरणी जेएनयूचा विद्यार्थी नेता उमर खालिद आणि जामिया मिलिया विद्यापीठाच्या दोन विद्यार्थी नेत्यांविरोधात दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

    दंगलीला चिथावणी देणारी भाषणे आणि वक्तव्ये केल्याबद्दल बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायद्याखाली उमर खालिद, जामिया मिलिया उस्मानिया विद्यापीठातील मीरन हैदर आणि सफूर्जा झर्गर या दोन विद्यार्थी नेत्यांविरोधात देशद्रोही भाषण करणे, दंगलीला चिथावणी देणे, खूनी हल्ल्यांसाठी जमावाला चिथावणी देणे, खूनी हल्ल्याचे प्रयत्न करणे आदी कलमांवरून गुन्हे दाखल केले.

    अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्याच्या दिवशी दिल्लीतील रस्त्यांवर अडथळे तयार करण्यास लोकांना चिथावणी देण्याचा गुन्हाही उमर खालिद विरोधात नोंदविण्यात आला आहे. मीरन हैदर हा लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाचा कार्यकर्ता आहे. तो जामिया मिलिया विद्यापीठातून पीएच डी करतोय तर सफूर्जा झर्गर हा एम फिलचा विद्यार्थी आहे. दोघेही सध्या पोलिस कोठडीत आहेत.

    Related posts

    युतीत सडले, आघाडीत बळी ठरले; पण सगळीकडे खाऊन पिऊन हे समजायला उद्धव ठाकरेंना 35 वे वर्ष का लागले??

    राहुल गांधींनी संघाचा द्वेष नाही करायचा, तर दुसरे करायचे तरी काय??

    मनोज जरांगेंनी मराठा समाजाला आज शासक + प्रशासक बनायचे सांगितले; मग त्यांनी 2024 च्या विधानसभा निवडणुकीत आपले मराठा उमेदवार का नव्हते दिले??