विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोरोना लॉकडाऊन काळात गरजूंना अन्नवाटपाच्या नावाखाली काँग्रेस कार्यकर्त्यांनी महागड्या दारूची तस्करी केली आहे. भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी त्यावर टीकास्र सोडले आहे.
अन्नवाटपाच्या गाडीतून महागड्या दारूच्या बाटल्या नेताना युवक काँग्रेसच्या दोन कार्यकर्त्यांना पोलिसांनी पकडले. काँग्रेसने मात्र या प्रकरणातून हात झटकले आहेत. पक्षाचे प्रवक्ते श्रीनिवास यांनी गरजू लोकांना अन्नवाटप केल्याचा गुन्हा आम्ही केला म्हणून पोलिसांनी कार्यकर्त्यांना पकडले, असा आरोप केला तर संबित पात्रा यांनी या निमित्ताने राहुल गांधींवर नेम साधला. “राहुलजी आपकी रणनीती क्या है?” असे ट्विट पात्रा यांनी केले.