विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : निजामुद्दीन परिसरातील तबलिगी जमातने आयोजित केलेल्या धार्मिक कार्यक्रमातून कोरोनाच्या फैलावाचे भीषण उदाहरण समोर आले असून जमातच्या कार्यक्रमात सामील झालेल्या १० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर २८५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. या १३ ते १५ मार्च दरम्यान हा कार्यक्रम झाला. यात एकूण १८०० जण सामील झाले होते. कार्यक्रम आयोजित करणाऱ्या मौलवी विरोधात दिल्ली सरकारने गुन्हा दाखल केला आहे. जमातच्या कार्यक्रमात सामील झालेल्यांपैकी ६ जणांचा तेलंगणात मृत्यू झाला. तमिळनाडू, कर्नाटकात प्रत्येकी एकाचा मृत्यू तर महाराष्ट्रात एका फिलीपिनो नागरिकाचा मृत्यू झाला. वाशीच्या मशिदीती तिघांना कोरोनाची लागण झाली आहे. कार्यक्रमात १९ देशांतील सुमारे २५० जण सामील झाले होते.
Delhi: People boarding buses in the Nizammudin area, to be taken to different hospitals for a checkup. A religious gathering was held in Markaz, that violated lockdown conditions and several #COVID19 positive cases have been found among those who attended the gathering. pic.twitter.com/BjCsxVkXEr
— ANI (@ANI) March 30, 2020
दिल्लीत सोमवार सायंकाळपर्यंत कोरोनाग्रस्तांचा आकडा २५ ने वाढला. यात १८ जण जमातमधील कार्यक्रमाशी संबंधित आहेत. त्यामुळे दिल्लीतील कोरोनाग्रस्तांचा आकडा १०० वर पोहोचला आहे. २८५ कोरोनाग्रस्तांना दिल्लीतील विविध हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे. तबलिगी जमातचे हे मुख्यालय बंगलेवाली मशीद नावाने ओळखले जाते. मार्च महिन्याच्या सुरवातीपासूनच धार्मिक कार्यक्रमात सामील होण्यासाठी विविध देशांमधून प्रतिनिधी आले होते. मशिदीत अजूनही १५०० लोक राहात असल्याची सूत्रांची माहिती आहे. पोलिसांनी बंगलेवाली मशीद ते निजामुद्दीन दर्गा पर्यंतचा मोठा परिसर खाली करवून घेतला आहे. तबलिगी जमातला मोठे फॉलोइंग आहे. यात पाकिस्तानी क्रिकेटपटू सईद अन्वरचाही समावेश आहे.