विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोरोना देशभर फैलावून बेमुर्वतखोरपणे त्याचे समर्थन करणाऱ्या तबलिग जमातला केंद्रीय गृह मंत्रालयाने जबरदस्त तडाखा दिला आहे. जानेवारी महिन्यापासून २८ मार्च पर्यंत तबलिगच्या मरकजमध्ये आलेल्या, राहिलेल्या व कार्यक्रमांमध्ये सामील झालेल्या ९६० परकीय नागरिकांना काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. एवढेच नव्हे तर त्या सर्वांचे व्हिसा रद्द करण्यात आले आहेत. कझाकस्तान, इंडोनेशिया, बांगलादेश यांच्यासह सुमारे १९ देशांमधून हे ९६० नागरिक टूरिस्ट व्हिसावर भारतात आले आहेत. त्या पैकी कोणाकडेही मिशनरी व्हिसा नाही. त्यामुळे त्यांचे तबलिग जमातच्या कार्यक्रमात सामील होणेही बेकायदा ठरू शकते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आणि तबलिग जमातच्या कार्यक्रमात सामील झालेल्या ९६० परकीय नागरिकांच्या विरोधातील कायदेशीर कारवाईच्या प्रक्रियेला वेग आला. मरकजमध्ये राहून कार्यक्रमात सामील झालेले ४०० लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळले. या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाने दिल्ली आणि सर्व राज्यांच्या डीजीपींना अँक्शन मोडमध्ये आणले आहे. १९४६ च्या परकीय नागरिक कायद्यानुसार आणि २००५ च्या डिझँस्टर मँनेजमेंट कायद्यानुसार ९६० परकीय नागरिकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
गृह मंत्रालय द्वारा पर्यटक वीजा पर तब्लीगी गतिविधियों में लिप्त पाए जाने के कारण 960 विदेशियों को ब्लैक लिस्ट किया गया है और साथ ही उनका भारतीय वीजा भी रद्द कर दिया गया है।
— गृहमंत्री कार्यालय, HMO India (@HMOIndia) April 2, 2020