विशेष प्रतिनिधी
पुणे : दिल्लीच्या निझामुद्दीन भागातील तबलिगी मरकजमधील धार्मिक कार्यक्रमांतून पिंपरी-चिंचवड शहरात आलेल्या 23 पैकी 2 जणांचे अहवाल ‘पॉझिटीव्ह’ आले आहेत. पुणे शहरातील 30 जणांचे अहवाल ‘निगेटिव्ह’ आले आहेत. अद्याप 60 जणांचे अहवाल येणे बाकी आहे.
दिल्ली मधील निजामुद्दीन परिसरात तबलीग ए जमात या संघटनेच्या वतीने तबलीगी जमानत हा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमासाठी भारताच्या विविध भागातून तसेच विदेशातून देखील मुस्लिम सहभागी झाले होते. हजारो लोक हे निजामुद्दीनमधील बंगलेवाली मशिदीत तबलीगी जमातच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते आणि त्यातील काही जण हे आधीच कोरोनाबाधित होते. त्यातील काही लोकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदर्शनास आले आहे.
त्यामध्ये पिंपरी-चिंचवड शहरातील 32 मुस्लीम या कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमात सहभागी झालेल्यांमध्ये कोरोना व्हायरसची लक्षणे दिसू लागल्याने खळबळ उडाली आहे. महापालिका प्रशासनाने त्या नागरिकांची माहिती काढण्यास सुरुवात केली आहे. आजपर्यंत ३२ जण सहभागी झाले होते, अशी माहिती मिळाली. त्यापैकी १४ जणांचा महापालिकेने शोध घेतला असून त्यांना महापालिका रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांचे नमुने बुधवारी तपासणीसाठी पाठविले होते, त्यांचा अहवाल आला असून त्यापैकी 2 जण पॉझिटिव्ह आहेत. त्यामुळे महापालिकेतील रुग्ण संख्या 4 वर गेली आहे. उर्वरीत १८ जणांचा शोध घेत आहोत.