वृत्तसंस्था
हैद्राबाद : दिल्लीतील निझामुद्दीनच्या तबलिगी जमातीच्या मरकझमध्ये देशभरातील तब्बल १३ हजार ७०२ लोक सहभागी झाल्याची धक्कादायक माहिती आंध्र प्रदेश पोलिसांनी दिली आहे.
मोबाइल टॉवरद्वारे मिळालेल्या माहितीच्या विश्लेषणाच्या आधारे हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. याचे कारण म्हणजे १३ हजारांवर जणांच्या संपर्कात किती जण असतील हा अअत्यंत जटील प्रश्न आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्यांना शोधून १४ दिवस क्वारंटाईनमध्ये ठेवण्याचे फार मोठे आव्हान प्रशासनासमोर असणार आहे.
यापैकी तब्बल ७,९३० लोक हे हाय रिस्कमध्ये आहेत. मध्यम स्वरुपाचा धोका असणार्यांची संख्या साडेपाच हजारांच्यावर आहे. यामध्ये सर्वाधिक अर्थात उत्तर प्रदेशातील आहेत. त्यानंतर तामिळनाडू, बिहार, झारखंड, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशाची संख्या आहे. त्यामुळे या राज्यांना चीनी व्हायरसचा सर्वाधिक धोका आहे.
आंध्र प्रदेशातील दोन रुग्णांबाबत माहिती मिळाल्यानंतर निझामुद्दीनच्या मरकझमध्ये जिल्ह्यातील कोण-कोण लोक सहभागी झाले होते, याची माहिती गोळा करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी आणि पोलिस अधिकक्षांना देण्यात आली होती. गुप्चतर यंत्रणांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय यंत्रणांबरोबरच जमातीत सहभागी होणाºया सर्वच लोकांचे डिजिटल डेटा विश्लेषण आणि मोबाइल टॉवरचे विश्लेषण करण्यात आले.
महाराष्ट्राला नियतीनेच वाचविले
तबलिगींचा हा मरकझ मुंबईजवळील वसई येथे होणार होता. मात्र महाराष्ट्रात ९ मार्च रोजी पुण्यात पहिला चीनी व्हायरसचा रुग्ण सापडला. त्यामुळे पोलीस अलर्ट झाले. त्यामुळे निझामुद्दीनच्या धर्तीवर वसईत होणार्या कार्यक्रमास परवानगी नाकारण्यात आली. अन्यथा निझामुद्दीनऐवजी वसईदेखील करोनाचं हॉटस्पॉट ठरण्याची भीती होती.
वसईमधील या कार्यक्रमाला ५० हजार लोक उपस्थित राहणार होते. वसईमध्ये १२-१३ मार्च रोजी सनसिटी येथे हा कार्यक्रम होणार होता. २२ जानेवारी रोजी आयोजकांनी कार्यक्रमासाठी परवानगी मागितली होती, ज्यासाठी ६ फेब्रुवारीला परवानगी देण्यात आली होती. पण राज्यात करोना व्हायरसचे दोन रुग्ण आढळले आणि परवानगी नाकारण्याचा निर्णय घेतला. वसईत मरकझ झाला असता तर येथे हजारो परदेशी नागरिक आले असते. अगदी मुंबईपासून ते ठाण्यापर्यंत ते सार्वजनिक वाहनातून फिरले असते.
तबलिगी जमातच्या नियोजनानुसार, महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी कार्यक्रम घेण्याची योजना होती. यामध्ये रायगड, रत्नागिरी, पुणे यांचा समावेश होती. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी यातील काहीजणांनी संपर्क साधला होता. मात्र, त्यांनी मोठ्या प्रमाणात लोक उपस्थित राहणार असतील तर हा कार्यक्रम रद्द करण्यास सांगितले.
तबलिगी जमातच्या दिल्लीतील मरकझमध्ये कार्यक्रमाला २५०० लोक उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी हजर राहिलेल्या अनेकांचा चीनी व्हायरसची लागण झाल्याने मृत्यू झाला आहे. हजारो लोकांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला हजर राहिलेल्या अनेकांचा शोध घेतला जात आहे. दिल्लीतील निझामुद्दीन हे ठिकाण कोरोनाचं हॉटस्पॉट झालं असून २००० लोकांना यामुळे करोनाची लागण झाली आहे.