• Download App
    तबलिगी जमातीचा प्रमुख मौलाना साद सावकारीही करता होता? | The Focus India

    तबलिगी जमातीचा प्रमुख मौलाना साद सावकारीही करता होता?

    संपूर्ण देशात चीनी व्हायरस पसरविण्याचे एक कारण बनलेल्या तबलिगी जमातीचा प्रमुख मौलाना साद विरोधात सक्तवसुली संचालनालयाने मनी लॉन्ड्रिंगची केस दाखल केली आहे. इस्लाममध्ये व्याज वसुलीला हराम म्हटले आहे. मात्र इस्लाम धर्माचे धडे देणारा साद हा स्वतःच सावकारी करत होता, असे प्रथमदर्शनी यातून पुढे आले आहे.


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : संपूर्ण देशात चीनी व्हायरस पसरविण्याचे एक कारण बनलेल्या तबलिगी जमातीचा प्रमुख मौलाना साद विरोधात सक्तवसुली संचालनालयाने मनी लॉन्ड्रिंगची केस दाखल केलीआहे.

    तबलिगी जमातीने दिल्लीतील निजामुद्दीन येथील मरकझमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकांना गोळा केले होते. देश आणि विदेशातून तबलिगी जमातीने मोठ्या प्रमाणात निधी जमविला होता. त्यासाठी हवालाचाही वापर करण्यात आला. मरकझच्या आयोजना अगोदरपासूनच मौलाना साद याच्या दिल्लीतील बॅँकेतील अकाऊंटमध्ये परदेशातून मोठ्या प्रमाणावर पैसे जमा झाले होते. त्यामध्ये पोलीसांनी याबाबत साद याच्या सीएला विचारणाही केली होती. इतक्या मोठ्या प्रमाणात देणगी येण्याचे कारण विचारण्यासाठी मौलाना साद यांना भेटण्याची विनंती केली होती. परंतु, मौलाना मोठी व्यक्ती आहेत. ते कोणालाही असे भेटत नाहीत, असे या सीएने पोलीसांना सांगितले होते.

    भारतातील चीनी व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे दिल्लीतील निजामुद्दीन येथील तबलिगी मरकझ आहे, असे आरोग्य मंत्रालयाने सांगितले होते. या ठिकाणी मोठ्या संख्येने परदेशी प्रवासी आले होते. लॉकडाऊनच्या काळातही तेथे धार्मिक कार्यक्रम सुरू होते. गृह मंत्रालयाच्या माहितीनुसार १३ हजारांवर तबलिगी तेथे जमा झाले होते. येथील तबलिगी कार्यकर्ते देशाच्या सर्व भागात गेले. सुरूवातीला केवळ शहरांपर्यंत मर्यादित असलेला चीनी व्हायरस त्यामुळे ग्रामीण भागातही पोहोचला.

    त्यामुळे सरकारच्या उपाययोजनांनाही मर्यादा आल्या मोठ्या संख्येने येथे आलेल्या परदेशी नागरिकांनी प्रवासी व्हिसा घेतला होता. इंडोनेशिया, मलेशिया येथील मरकझमध्ये हे सहभागी झाले होते.
    मौलाना साद याच्या विरुध्द पोलीसांनी या अगोदरच सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. इडीने आता मनी लॉन्ड्रिंगची केस दाखल केल्याने त्याला जामीन मिळू शकणार नाही. दोषी आढळल्यास त्याला १० वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो.

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…