विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : तबलिगी जमातचे मौलाना महंमद साद यांच्या विरोधात दिल्ली पोलिसांच्या क्राइम ब्रँचने ‘साथीचे रोग प्रादूर्भाव प्रतिबंधक कायद्यानुसार’ गुन्हा दाखल केला आहे. कलम २६९, २७०, २७१ आणि १२० बी कलमानुसार हा फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मौलाना मगहंमद साद यांच्या हट्टामुळे हे घडले. इमामांना टॉर्चर केले. मशिदी उघडायला लावल्या.
तबलिगी जमातने प्रशासनाला सहकार्य केले नाही. महंमद सादचा ऑडिओ व्हायरल झाला. यात तो मशीद खुली करण्याचे अवाहन करताना ऐकू येते. नंतर महंमद साद हा मरकज परिसरातून कुटुंबासह फरार झाला आहे. मदरसे १४ मार्चपासून बंद केले. तरीही महंमद साद आवाहन करीत राहिला, “मशीद बंद करू नका. बैठक, सामुहिक नमाज बंद करू नका.
नमाज पठण केले तर अल्ला तुम्हाला वाचवेल. मरकजवाल्यांविरोधात केस दाखल झालीच पाहिजे, अशी मागणी मुस्लीम विचारवंतांनी केली. तबलिगी जमात प्रवक्ते मुशर्रफ अली, मेहेर इलाही : कोणतीही मशीद बंद नाही. मशीद बंद करण्याचे काही नियम असतात.