विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : आधी मलेशिया नंतर भारत आणि आता पाकिस्तान. तबलिगी जमातीच्या म्होरक्यांनी या देशांमध्ये गावगन्ना फिरून कोरोनाचे हॉटस्पॉट बनविल्याचे स्पष्ट होत आहे. तबलिगींच्या संपर्कामुळे कोरोनाग्रस्त झालेल्यांची संख्या दक्षिण आशियात लाखांनी मोजण्याची झाली आहे. फेब्रुवारीच्या सुरवातीपासून मध्यापर्यंत तबलिंगी जमातीने मलेशियात धार्मिक मेळावा घेतला. त्याला १५ हजारांहून जास्त तबलिगी जमले होते. त्यावेळी कोणत्याही देशात लॉकडाऊन नव्हते पण कोरोना फैलावाचे इशारे देण्यात येत होते. या इशाऱ्यांना तबलिगी जमातीने जुमानले नाही.
मलेशियात कोरोना फैलावून झाल्यानंतर तबलिगींनी दिल्लीत निजामुद्दीनच्या मरकजमध्ये मेळावा भरवला. तेथून दीड हजारांपासून आकडे बाहेर यायला सुरवात झाली. ते आकडे नंतर ९००० पर्यंत फुगत गेले. तबलिगी जमातीचे लोक २३ राज्यांमध्ये फिरलेले आढळले. जमातीचा म्होरक्या मौलाना महंमद साद फरार झाला. भारतातील ३०% कोरोनाग्रस्त तबलिगी जमातीशी संबंधित असल्याचे वैद्यकीय पुराव्यांनी सिद्ध झाले.
पाकिस्तामधल्या लाहोरनजीक रायविंडमध्ये तबलिगी जमातीने धार्मिक मेळावा घेतला. त्याला सुमारे ७० हजार लोक हजर होते, असे सांगितले जाते. कोरोनाचा फैलाव जगभर झाल्यानंतर पाकिस्तानी सरकारने ऑर्डर काढून मेळावा बंद केला पण तो पर्यंत तबलिगी पूर्ण पाकिस्तानात फिरत होते. त्यांच्या संपर्कामुळे सुमारे ८००० जण कोरोनाग्रस्त झाले.