• Download App
    टपाल खात्याने २१ लाख लाभार्थींपर्यंत ४१२ कोटी रुपये पोहोचविले | The Focus India

    टपाल खात्याने २१ लाख लाभार्थींपर्यंत ४१२ कोटी रुपये पोहोचविले

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : भारतीय टपाल सेवेने कोरोना लॉकडाऊनच्या काळात बँकिंग व्यवस्थेत क्रांतीच केली आहे. २१ लाख लाभार्थींना ४१२ कोटी रुपयांची रोख रक्कम पोहोचविली आहे.

    यात प्रामुख्याने शहरी, निमशहरी आणि ग्रामीण भागात जेथे लोकांची बँकेत जनधन खाती आहेत पण बँकांच्या शाखा नाहीत तेथे टपाल कर्मचाऱ्यांमार्फत लाभार्थी व्यक्तींना रोख रक्कम देण्यात आली आहे. २३ मार्च ते २१ एप्रिल पर्यंतची ही आकडेवारी आहे.

    केंद्र सरकारने लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम भरली होती. ही रक्कम सर्वांपर्यंत पोहोचावी यासाठी टपाल खात्याने फोनची सेवाही उपलब्ध करवून दिली होती. फोन केल्यावर १५ ते २० मिनिटांत पोस्टमननी लाभार्थ्यांपर्यंत जाऊन रक्कम दिली. ही योजनाही अजून सुरू आहे.

    Related posts

    Operation sindoor : सियालकोट, चकलाला यांच्यासह 7 पाकिस्तानी हवाई आणि लष्करी तळांवर भारताचे हल्ले; ब्राह्मोस आणि S400 सिस्टीम उद्ध्वस्त केल्याचे पाकिस्तानचे दावे खोटे!!

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा

    भारत-पाक तणावात राफेल उत्पादक कंपनीचे शेअर्स वधारले; डसॉल्ट एव्हिएशनचे शेअर्स 2 आठवड्यांत 8% वाढले