विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारतीय टपाल सेवेने कोरोना लॉकडाऊनच्या काळात बँकिंग व्यवस्थेत क्रांतीच केली आहे. २१ लाख लाभार्थींना ४१२ कोटी रुपयांची रोख रक्कम पोहोचविली आहे.
यात प्रामुख्याने शहरी, निमशहरी आणि ग्रामीण भागात जेथे लोकांची बँकेत जनधन खाती आहेत पण बँकांच्या शाखा नाहीत तेथे टपाल कर्मचाऱ्यांमार्फत लाभार्थी व्यक्तींना रोख रक्कम देण्यात आली आहे. २३ मार्च ते २१ एप्रिल पर्यंतची ही आकडेवारी आहे.
केंद्र सरकारने लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम भरली होती. ही रक्कम सर्वांपर्यंत पोहोचावी यासाठी टपाल खात्याने फोनची सेवाही उपलब्ध करवून दिली होती. फोन केल्यावर १५ ते २० मिनिटांत पोस्टमननी लाभार्थ्यांपर्यंत जाऊन रक्कम दिली. ही योजनाही अजून सुरू आहे.