• Download App
    जनधन खातेदार महिलांना सोमवारपासून केंद्रातर्फे दुसरा हप्ता | The Focus India

    जनधन खातेदार महिलांना सोमवारपासून केंद्रातर्फे दुसरा हप्ता

    चीनी व्हायरस विरुध्दच्या संकटात सर्वाधिक फटका गोरगरीब महिलांना बसला आहे. त्यांना यातून काहीसा दिलासा देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनधन खातेदार महिलांना दर महिन्याला ५०० रुपये देण्याची योजना आखली होती. त्यातील पहिला हप्ता गेल्या महिन्यात देण्यात आला. दुसरा हप्ता सोमवारपासून मिळणार आहे.


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : चीनी व्हायरस विरुध्दच्या संकटात सर्वाधिक फटका गोरगरीब महिलांना बसला आहे. त्यांना यातून काहीसा दिलासा देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनधन खातेदार महिलांना दर महिन्याला ५०० रुपये देण्याची योजना आखली होती. त्यातील पहिला हप्ता गेल्या महिन्यात देण्यात आला. दुसरा हप्ता सोमवारपासून मिळणार आहे.

    अर्थ मंत्री निर्मला सितारामन यांनी शनिवारी याबाबत घोषणा केली. जनधन खातेदार महिलांना तीन महिन्यांपर्यंत हे पाचशे रुपये मिळणार आहेत.

    अर्थ सचिव देबाशिष पांडा यांनी याबाबत सांगितले की, बॅँक खात्यात रक्कम पाठविण्यात आली आहे. प्रत्येकाने फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करूनच बॅँकेतून पैसे काढले पाहिजेत. त्याचबरोबर बॅँक खात्याच्या शेवटच्या क्रमांकाच्या आधारावर महिलांना तारीख दिली जाणार आहे. त्याप्रमाणे महिला पैसे काढण्यासाठी बॅँकेमध्ये जाऊ शकतात. उदा. ज्या महिलांच्या खात्याचा क्रमांक शून्य आहे त्या ४ मे रोजी पैसे काढू शकतात.

    ११ मे पर्यंत या महिलांना त्यांच्या खात्याच्या शेवटच्या क्रमांकानुसार पैसे काढता येणार आहेत.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनी व्हायरसच्या संकटाचा सामना करण्यासाठी १ लाख ७० हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले होते. त्याप्रमाणे ही रक्कम महिलांना देण्यात येणार आहे. केंद्र सरकारने देशातील प्रत्येक नागरिकाचे बॅँकेत खाते उघडण्यासाठी मोहीम सुरू केली होती. त्याप्रमाणे अगदी गरीबातील गरीब नागरिकांची खाती उघडण्यात आली होती. त्यामुळे गरीबांच्या खात्यात थेट मदत पाठविणे सोपे झाले आहे.

    Related posts

    सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपतीपदी; मोदी सरकार पाडण्यासाठी राहुल बाबा उंगल्या करायला गेले; पण INDI आघाडीच्या खासदारांचीच एकजूट नाही टिकवू शकले!!

    मातोश्री भेटीनंतर काँग्रेसचे नेते गेले फडणवीसांकडे; विधान परिषदेतल्या विरोधी पक्षनेते पदासाठी घातले साकडे; महाराष्ट्राचे राजकारण 360° मध्ये फिरल्याचे चिन्ह दिसले!!

    पवारांनी दाखवली आपल्या पक्षाच्या खासदारांची एकजूट; पण ते टाळू शकतील का INDI आघाडीतल्या खासदारांची फूट??