जगाच्या वेदनेवर फुंकर घालण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने पॅरासिटामॉल या औषधावर घातलेली निर्यातबंदी उठविली आहे. पॅरासिटामॉल हे वेदनाशामक औषध आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : जगाच्या वेदनेवर फुंकर घालण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने पॅरासिटामॉल या औषधावर घातलेली निर्यातबंदी उठविली आहे.
पॅरासिटामॉल हे वेदनाशामक औषध आहे. चीनी व्हायरसच्या संकटात संपूर्ण जगाला मदत करण्याची भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली आहे. यामुळे हाइड्रोक्सीक्लोरोक्वीन या औषधावरची निर्यातबंदीही उठविण्यात आली होती. तब्बल १२० देशांना हाइड्रोक्सीक्लोरोक्वीन पुरविले होते.
सरकारने १७ एप्रिलला अंतर्गत पुरवठा सुरळित राहावा यासाठी पॅरासिटामॉलच्या निर्यातीवर बंदी घातली होती. परंतु, आता देशाची गरज भागेल यापेक्षा जास्त पॅरासिटामॉल उपलब्ध आहे. त्याचबरोबरी चीनी व्हायरसच्या संकटात अनेक देशाांनी भारताकडे या औषधाची मागणी केली आहे. त्यामुळे मानवतेच्या भूमिकेतून ही निर्यातबंदी उठविण्यात आली आहे.
अनेक देशांनी पॅरासिटामॉलची मागणी केली आहे. प्रामुख्याने ताप आल्यावर होणाऱ्या वेदना दूर करण्यासाठी या औषधाचा उपयोग होता. चीनी व्हायरसचा प्रकोप वाढल्यावर जगात सर्वत्रच या औेषधाची मागणी वाढली आहे. आपल्या नागरिकांची वेदना दूर करावी, अशी मागणी केली होती. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.