चीनी व्हायरसवर लस तयार झाल्याशिवाय हे संकट जाणार नाही. त्यामुळे जगातील सर्वच देश लसीच्या संशोधनासाठी काम करत आहेत. भारतातही त्यासाठी काम सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोनाचा प्रतिबंध करणारी लस शोधणाऱ्या डॉक्टरांच्या टास्क फोर्ससोबत बैठक घेऊन त्यांची उमेद वाढविली.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : चीनी व्हायरसवर लस तयार झाल्याशिवाय हे संकट जाणार नाही. त्यामुळे जगातील सर्वच देश लसीच्या संशोधनासाठी काम करत आहेत. भारतातही त्यासाठी काम सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोनाचा प्रतिबंध करणारी लस शोधणाऱ्या डॉक्टरांच्या टास्क फोर्ससोबत बैठक घेऊन त्यांची उमेद वाढविली.
पंतप्रधानांनी लस शोधण्याबाबत देशात सध्या काय सुरु आहे याची माहिती त्यांच्याकडून घेतली. लस शोधण्याचे काम कोठपर्यंत आले आहे, त्याबाबत काय निदान आत्तापर्यंत डॉक्टरांनी केले आहे आणि चाचण्या करण्यात आल्या आहेत का? याचा आढावाही पंतप्रधांनी घेतला.
चीनी व्हायरसच्या विरोधात लस शोधण्याच्या कामात भारतीय कंपन्यानी पुढाकार घेतला आहे. सध्या विविध प्रकारच्या ३० लसींवर काम सुरु आहे तर काही लसी या चाचणीच्या टप्प्यात आहेत अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाने दिली आहे.
चीनी व्हायरसवर लस बनवण्याचे आव्हान भारताच्या तरुण शास्त्रज्ञांनी, डॉक्टरांनी स्वीकारावं, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ एप्रिल रोजी त्यांच्या भाषणात केले होते. भारताच्या युवा शास्त्रज्ञांना चीनी व्हायरसवरील लस बनवण्याचा विडा उचलण्याचं आवाहन केले होते. भारताकडे आज मर्यादित साधनसामुग्री जगाच्या कल्याणासाठी, मानवजातीच्या कल्याणासाठी पुढे यावे असे आवाहन पंतप्रधानांनी केले होते. लस तयार करण्यासाठी सुमारे 50 देशांमध्ये संशोधन चालू आहे.