चीनी व्हायरसच्या संकटाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीयांमध्ये विश्वासाची भावना निर्माण केली आहे. त्यामुळे लोकप्रियतेच्या निकषात मोदींनी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रंप आणि रशियाचे अध्यक्ष व्हाल्दमीर पुतिन यांना मागे टाकले आहे.
विशेष प्रतिनिधी
पुणे : चीनी व्हायरसच्या संकटाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीयांमध्ये विश्वासाची भावना निर्माण केली आहे. त्यामुळे लोकप्रियतेच्या निकषात मोदींनी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रंप आणि रशियाचे अध्यक्ष व्हाल्दमिर पुतिन यांना मागे टाकले आहे.
न्यूयॉक टाईम्सने हे वृत्त दिले आहे.
अमेरिकेची एक संस्था मॉर्निंग कन्सलटंट या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणाचा हवाला यासाठी देण्यात आला आहे. ही संस्था जगभरात ऑनलाईन सर्व्हे करत असते. विशेष म्हणजे भारतातील आणि जगभरातील अर्थतज्ज्ञांनी पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजचे कौतुक केले आहे.
जगभरातच चीनी व्हायरसच्या संकटाने थैमान घातले आहे. भारतातील संख्याही एक लाखावर गेली आहे. तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत या संकटातून बाहेर पडेल, असे भारतीयांना वाटत आहे. त्यामुळेच त्यांची लोकप्रियता वाढली आहे. ट्रंप आणि पुतिन यांनी ज्या पध्दतीने चीनी व्हायरसच्या संकटाचा सामना केला त्यापेक्षा कितीतरी चांगल्या पध्दतीने मोदींनी परिस्थिती हाताळल्याचे बहुतांश लोकांनी म्हटले आहे. मोदींनी ट्रंप यांच्याप्रमाणे चीनी व्हायरसचे संकट कमी असल्याचे कधीही म्हटले आहे. त्याबाबतचे गांभिर्य टिकवून ठेवतही लोकांना निराश होऊ दिले नाही. त्यामुळे काही महिन्यांपूर्वी ८० टक्के असलेली मोदींची विश्वासार्हता ९० टक्यांवर पोहोचली आहे.
मोदींच्या नेतृत्वाखाली भारत या संकटातून बाहेर पडण्यास यशस्वी झाल्यास भारतीय जनता पक्षाची लोकप्रियताही मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्यामुळे भाजपा आणखी मजबूत होणार असल्याचे सर्वेक्षणात म्हटले आहे. केवळ ट्रंप आणि पुतिनच नव्हे तर जर्मनीच्या चॅन्सलर अॅंजेला मार्केल, इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन आणि इतर अनेक नेत्यांपेक्षा मोदी यांचे काम चांगले असल्याचे मत लोकांनी या सर्वेक्षणात नोंदवले आहे