विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशवासियांच्या मनात पुन्हा एकदा उमे दनिर्माण केली. चीनी व्हायरस विरोधातील लढाईत माणुसकीच जिंकणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, अजिबात घाबरू नका. फक्त योग्य काळजी घ्या. आपण सर्व मिळून करोनाला नक्कीच हरवू.
लॉकडाऊनमुळे रेशन आणि इतर आवश्यक गोष्टींसाठी ज्यांना अडचणींचा सामना करावा लागतो त्यांच्यासाठी हे ट्विट आहे. असं मोदी म्हणाले.
मोदींनी आपल्या या ट्विटसोबत केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे ट्विटही रिट्विट केले. अन्न महामंडळाकडून अन्नधान्याचा पुरवठा सुरळीत राहण्यासाठी सतत प्रयत्न केले जात आहे, असे पासवान यांच्या ट्विटमध्ये म्हटलंय.