चीन व्हायरस विरुध्द लढण्यासाठी तयार केलेल्या मंत्रीगटाने रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी पारंपरिक भारतीय वैद्यक शास्त्राचा उपयोग करण्याचा निर्णय घेतला आहे.
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : चीन व्हायरस विरुध्द लढण्यासाठी तयार केलेल्या मंत्रीगटाने रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी पारंपरिक भारतीय वैद्यक शास्त्राचा उपयोग करण्याचा निर्णय घेतला आहे.
केंद्रीय मंत्रीमंडळाच्या मंत्रीगटाची शुक्रवारी बैठक झाली. निदान, लस, औषधे, वैद्यकीय उपकरणे आणि इतर शुश्रूषा या संदर्भात विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थांच्या कामांचा यावेळी आढावा घेण्यात आला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत एक कृती समिती तयार केली आहे. आयुर्वेदाच्या माध्यमातून चीनी व्हायरसवर उपचार शोधण्याची जबाबदारी या समितीकडे देण्यातआली आहे. आयुर्वेद आणि पारंपरिक औषधांच्या मदतीने चीनी व्हायरसला नियंत्रणात ठेवणारे उपचार शोधण्याच्या सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत.
सीएसआयआर आणि आण्विक ऊर्जा विभाग यांसारख्या संस्था चाचण्यांची क्षमता वाढवण्यावर काम करत आहेत. नव्या, रॅपिड आणि अचूक निदान करणाऱ्या चाचण्या किट्स विकसित करण्यावर आहे. या किट्स मुळे केवळ अर्ध्या तासात निकाल करेल.
या आजारावर खात्रीशीर औषध अजून आलेले नाही. कोविड19 विरुद्धच्या बहुआयामी लढ्याचा भाग म्हणून रोगप्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या पारंपरिक भारतीय वैद्यकशास्त्राचाही विचार सुरु आहे.
सीएसआयआरच्या प्रयोगशाळा स्वदेशी बनावटीचे पीपीई किट आणि इतर पूरक उपकरणे तयार करत आहेत. स्वदेशी बनावटीचे किट तयार करण्याचे काम सुरू आहे, मेपर्यंत प्रत्येक प्रकारच्या दहा लाख किट्सची निर्मिती करता येईल.
चीनी व्हायरसमुळे देशभरात झालेल्या मृत्यूंचा अभ्यास करण्यात येत आहे. यातील बहुतांश मृत्यू हे इतर आजारामुळे रुग्णाची प्रतिकार शक्ती कमी झाल्यामुळे झालेले आहेत. त्यामुळे भारतीय पारंपरिक औषधांच्या माध्यमातून नागरिकांची प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. देशभरातील आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या महाविद्यालयांमध्ये हे काम सुरू झाले आहे.