चीनी व्हायरसच्या विरोधातील लढाईत राज्यांपासून ते जिल्हापातळी आणि महानगरपालिकांना मनुष्यबळ उपलब्ध करण्यासाठी केंद्र सरकारने आॅनलाईन डाटा पूल तयार केला आहे. डॉक्टर, परिचारिका आणि इतर आरोग्यसेवा व्यवसायिक, एनवायकेएस. एनसीसी, एनएसएस आणि पीएमजीकेव्हीवायचे स्वयंसेवक, माजी सैनिक इत्यादींसह डॉक्टरांच्या महत्वपूर्ण माहितीचा आॅनलाईन डेटा पूल उपलब्ध केला आहे.
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : चीनी व्हायरसच्या विरोधातील लढाईत राज्यांपासून ते जिल्हापातळी आणि महानगरपालिकांना मनुष्यबळ उपलब्ध करण्यासाठी केंद्र सरकारने आॅनलाईन डाटा पूल तयार केला आहे. डॉक्टर, परिचारिका आणि इतर आरोग्यसेवा व्यवसायिक, एनवायकेएस. एनसीसी, एनएसएस आणि पीएमजीकेव्हीवायचे स्वयंसेवक, माजी सैनिक इत्यादींसह डॉक्टरांच्या महत्वपूर्ण माहितीचा आॅनलाईन डेटा पूल उपलब्ध केला आहे.
डॅशबोर्डवर अपलोड केलेल्या माहितीमध्ये वेळोवेळी सुधारणा केली जाणार आहे. केंद्राने सर्व राज्याच्या मुख्य सचिवांना एक संयुक्त पत्र पाठविले आहे आरोग्यसेवा व्यावसायिक आणि स्वयंसेवकांच्या तपशिलाचा डॅशबोर्ड मास्टर डेटाबेस कार्यान्वित केला आहे. यामध्ये मुख्य अधिकाीवरच्या संपर्क तपशिलासह विविध गटातील मनुष्य बळाची राज्यस्तरीय आणि जिल्हानिहाय माहिती उपलब्ध आहे.
या डेटाबेसचा उपयोग बँक, शिधावाटप दुकाने, मंडई येथे सामाजिक अंतर लागू करण्यासाठी तसेच वृद्ध, दिव्यांग आणि अनाथाव्यक्तींना मदत करण्यासाठी स्वयंसेवकांच्या सेवांचा वापर करण्यासाठी केला जाऊ शकतो.
मनुष्यबळ एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी नेण्यासाठी देखील याचा उपयोग होईल. डॉक्टर, परिचारिका, पॅरामेडिक्स, स्वच्छता कामगार, तंत्रज्ञ, आयुष डॉक्टर आणि कर्मचारी तसेच इतर आघाडीचे कामगार आणि स्वयंसेवकांच्या प्रशिक्षण आणि क्षमता वृद्धीसाठी आॅनलाइन प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. सरकारने कोविड-19 मुळे उद्भवलेल्या आव्हानांचा सामना करण्यासाठी त्यावर उपयायोजना शोधून काढण्याकरिता ११ सशक्त गटांची स्थापन केली आहे.