चीनी व्हायरसने संपूर्ण मानवजातीवर संकट आणले आहे. या भयानक साथीमुळे सगळेच देश संकटात आहेत. पण, ज्या ठिकाणाहून चीनी व्हायरसचा उद्भव झाला त्या चीनला महामारीचा फायदा होणार आहे का? जगाच्या सत्तासमतोलात चीन अमेरिकेची जागा घेणार का? असा प्रश्न आता सर्वांना पडला आहे. प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या ‘द इकॉनॉमिस्ट’ या मासिकाने यंदाच्या आठवड्याची आपली मुखपृष्ठकथा (कव्हर स्टोरी) हिच केली आहे.
खास प्रतिनिधी
पुणे : चीनी व्हायरसने संपूर्ण मानवजातीवर संकट आणले आहे. या भयानक साथीमुळे सगळेच देश संकटात आहेत. पण, ज्या ठिकाणाहून चीनी व्हायरसचा उद्भव झाला त्या चीनला महामारीचा फायदा होणार आहे का? जगाच्या सत्तासमतोलात चीन अमेरिकेची जागा घेणार का? असा प्रश्न आता सर्वांना पडला आहे. प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या ‘द इकॉनॉमिस्ट’ या मासिकाने यंदाच्या आठवड्याची आपली मुखपृष्ठकथा (कव्हर स्टोरी) हिच केली आहे.
चीनमध्ये सर्वात पहिल्यांदा व्हायरसचा उद्रेक झाला. हजारो लोकांचे बळी गेले. निश्चित बळींचा आकडा किंवा बाधितांची संख्या चीनच्या पोलादी पडद्याआडून कधीही बाहेर येणार नाही. परंतु, अत्यंत भयानक पध्दतीने चीनने या साथीवर नियंणि मिळविले. त्यासाठी शहरे बंद करून टाकली. दाराला फळ्या ठोकून नागरिकांना घरात कोंडून ठेवले. मात्र, आता त्यांच्या देशातील व्हायरस बाधितांची संख्या कमी होऊ लागली आहे. त्यांचे संशोधक लसीचा शोध लावण्यासाठी मेहनत करत आहेत. कंपन्या सुरू झाल्या आहेत. उत्पादन सुरू असून त्याची निर्यातही होऊ लागली आहे. चीनी विषाणूचा मुकाबला करण्यासाठी लाखोंच्या संख्येने मास्क आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक पीपीई कीट्ससुद्धा ज्या चीनमधून कोरोनाचा उद्रेक झाला, त्याच चीनमधून निर्यात होऊ लागले आहेत.
दुसऱ्या बाजुला पाश्चात्य म्हणविल्या जाणाऱ्या युरोप आणि अमेरिकेत चीनी व्हायरसचा हाहा:कार अजूनही सुरू आहे. चीनच्या अधिकृत मृत्यूच्या आकड्यापेक्षा कितीतरी अधिक लोक युरोप आणि अमेरिकेत मरण पावले आहेत. ब्रिटन, फ्रान्स, स्पेन, इटली आणि अमेरिकेत खूपच जास्त आहे. पाश्चात्य देशातील परराष्ट्र धोरण पाहणारे चिंतीत झाले आहेत. काहींनी असा इशारा दिला आहे की साथीच्या रोगाचा केवळ मानवी आपत्ती म्हणूनच नव्हे तर अमेरिकेचे महासत्ता म्हणून स्थान गमावण्याचे राजनैतिक वळण म्हणूनही लक्षात ठेवला जाईल. ते बरोबर आहेत ना? याचा शोध ‘द इकॉनॉमिस्ट’च्या यंदाच्या अंकात घेतला जाणार आहे