चीनी व्हायरसच्या चाचण्या आता स्वदेशी किटसद्वारे होणार आहे. त्यामुळे पुढच्या काही काळात चाचण्यांची संख्या वाढून रुग्णांची संख्या कमी होईल, असा विश्वास केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी दिली आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : चीनी व्हायरसच्या चाचण्या आता स्वदेशी किटसद्वारे होणार आहे. त्यामुळे पुढच्या काही काळात चाचण्यांची संख्या वाढून रुग्णांची संख्या कमी होईल, असा विश्वास केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी व्यक्त केला आहे.
देशात आतापर्यंत ४५२ प्रयोगशाळा स्थापन करण्यात आल्या आहेत. या प्रयोगशाळांमधून सध्या रोज ८० हजार चाचण्या होत आहेत. ३१ मेपर्यंत रोज १ लाख चाचण्या करण्याचं आरोग्य विभागाचं लक्ष्य आहे.
देशात सध्या प्रत्येक जिल्ह्यात आता चाचण्या होत आहेत. काही नागरिकांच्या चाचण्यांचे रिपोर्ट उशिरा येत असल्याने ही समस्याही लवकरच सोडवली जाईल. आपले शास्त्रज्ञ या महिन्यात रॅपिड अँटीबॉडी टेस्ट किट्स आणि आरटी-पीसीआर टेस्ट किट्स भारतात बनवण्यात सुरुवात करणार आहेत. पुढच्या काळात या टेस्ट किट्सचा उपयोग होईल. ही देशासाठी आनंदाची बाब आहे, असे हर्षवर्धन यांनी स्पष्ट केले.
ऐवढचे नव्हे तर चीनी व्हायरसच्या टेस्टींग किटची अधिकाधिक निर्मिती करून निर्यातीद्वारे भारताला टेस्टींगमधील सुपरपॉवर बनविण्याची योजना निती आयोगाने आखली आहे. यासाठी शास्त्र आणि प्रयोगशाळांचे खासगी उद्योगांशी सहकार्य वाढविणार आहे. याद्वारे एक कोटी रॅपीड टेस्टींग किटचे उत्पादन केले जाणार आहे. या किटच्या पुरवठा साखळीसाठी खासगी उद्योगांकडूनही मदत घेतली जाणार आहे .