विशेष प्रतिनिधी
ऑक्सफोर्ड : चीनी व्हायरस कोविड १९ ला अटकाव करून त्याचा सार्वत्रिक प्रादूर्भाव रोखण्यात भारत सरकारच्या उपाययोजना प्रभावी ठरल्या आहेत, असे ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या ब्लावन्टनिक स्कूलच्या संशोधनात आढळून आले आहे.
कोविड १९ चा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जगभरातील सरकारांचा प्रतिसाद काय आहे, हे जोखणारा ट्रँकर ब्लावन्टनिक स्कूलने तयार केला आहे. त्याद्वारे ७३ कोरोना पीडित देशांमधील डाटाचे दररोज विश्लेषण केले जाते. यात कोविड १९ प्रतिबंधक वैद्यकीय – आरोग्य उपाययोजना, या संवेदनशील काळात आरोग्य क्षेत्रातील गुंतवणूक, वित्तीय उपाययोजना, कोविड १९ प्रतिबंधक औषध शोधण्यासाठीची गुंतवणूक, संक्रमण रोखण्यासाठीच्या लॉकडाऊन, शाळा महा विद्यालये, सार्वजनिक ठिकाणे बंद ठेवण्याच्या उपाययोजना असे एकूण ११ निकष या संशोधन पद्धतीत ट्रँकरमध्ये निश्चित करण्यात आले आहेत.
वरील निकषांमध्ये न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, मॉरिशस आणि इस्राएल यांना १००% गुण मिळाले. तुलनेने या कमी लोकसंख्येच्या देशांमध्ये भारतानेही स्थान मिळविले आहे. भारताचाही स्कोअर १०० % वर पोचला आहे.
वर उल्लेख केलेल्या देशांच्या तुलनेत प्रगत असलेले फ्रान्स, झेक रिपब्लिक, इटलीचा स्कोअर ९०% आहे. वास्तविक इटलीची परिस्थिती कोविड १९ प्रादूर्भावाच्या काळात युरोपात सर्वाधिक बिकट आहे. पण इटालियन सरकारनेही चिकाटीने प्रभावी उपाययोजना केल्याचे दिसून येत आहे. अमेरिका आणि जर्मनी या देशांचा स्कोअर ८०% मध्ये अडकला आहे तर ब्रिटनचा स्कोअर ७०% आहे. या देशांच्या सरकारांनी उपाययोजनांमध्ये सुधारणा करून त्यांचा वेग आणि व्याप्ती वाढविण्याची गरज आहे, असे संशोधनाचा निष्कर्ष सांगतो.
अर्थात या व्हायरसचा उगम ज्या देशातून झाला, त्या चीनचा या संशोधनात समावेश होऊ शकला नाही कारण त्या देशाचे सरकार कोविड १९ संबंधीचा डाटा उपलब्ध करून देत नाही.