विशेष प्रतिनिधी
नागपूर : चीनमधील मिरची व्यापारी उमरेडला मुक्कामी असल्याची बाब सोमवारी रात्री उघडकिस आली. हुआंग हॅन (४१) असे या चिनी व्यापार्याचे नाव असून तो गेल्याकाही दिवसांपासून उमरेडच्या ‘डी मर्सी’ हॉटेलात मुक्कामी होता.
यानंतर उमरेडची आरोग्य विभाग यंत्रणा खळबळून जागी झाली. रात्री आणि आज मंगळवारी दुपारी 2.30 वाजेपर्यंत कोणाचाही प्रतिसाद न मिळाल्याने या चिनी पाहुण्याचा आणखी रेंगाळला. अखेरीस दुपारी 3 वाजता या पाहुण्याला नागपूर मेयो रुग्णालयात रवाना करण्यात आले.