• Download App
    चिंताग्रस्त नाशिक ! मालेगावातील करोना रुग्णसंख्या अडीचशेपार; रात्रीतच ८२ नवीन रुग्ण | The Focus India

    चिंताग्रस्त नाशिक ! मालेगावातील करोना रुग्णसंख्या अडीचशेपार; रात्रीतच ८२ नवीन रुग्ण

    • सायंकाळी ११ तर रात्री प्राप्त अहवालानुसार अनुक्रमे ४४ व २७ असे ८२ रुग्ण पॉझिटिव्ह

    विशेष प्रतिनिधी

    मालेगाव : मालेगावात करोना व्हायरसने उद्रेक केला असून आज दिवसभरात तब्बल ८२ नवीन करोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. सायंकाळी ११ रुग्ण आढळून आल्यानंतर रात्री उशिरा प्राप्त अहवालानुसार अनुक्रमे ४४ व २७ रुग्णांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

    मालेगाव शहरात करोनाची रुग्णसंख्या वाढून २५३ झाली आहे. या सर्व रूग्णांवर (कॉविड-19) रुग्णालयात उपचार सुरू आहे. रात्री उशिरा १५२ रुग्णांचे अहवाल प्राप्त झाले असून यातील ४४ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले होते त्यात ३ महिन्याच्या चिमुकलीचाही समावेश होता. त्यात २७ जणांची भर पडली आहे. नाशिक जिल्ह्यात करोनाची रुग्णसंख्या २७६ वर पोहचली असून धोका वाढला असल्याचे चित्र आहे. तर मृतांची संख्या १३ इतकी झाली आहे.

    Related posts

    लोकांची मते मिळवण्यासाठी “नैसर्गिक युती” आणि सत्ता भोगण्यासाठी “महायुती”; हीच २९ महापालिकांच्या निवडणुकीची खरी कहाणी!!

    चार घरे लाटणाऱ्या माणिकराव कोकाटेंना कायदेशीर आणि राजकीय शिक्षेचा एक न्याय; मग १८०० कोटींच्या जमीन घोटाळ्यात पार्थ पवारला दुसरा न्याय का??

    राष्ट्रवादीतली घोटाळखोरी; सगळे “पवार संस्कारित” अमित शाहांच्या दारी!!