- सायंकाळी ११ तर रात्री प्राप्त अहवालानुसार अनुक्रमे ४४ व २७ असे ८२ रुग्ण पॉझिटिव्ह
विशेष प्रतिनिधी
मालेगाव : मालेगावात करोना व्हायरसने उद्रेक केला असून आज दिवसभरात तब्बल ८२ नवीन करोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. सायंकाळी ११ रुग्ण आढळून आल्यानंतर रात्री उशिरा प्राप्त अहवालानुसार अनुक्रमे ४४ व २७ रुग्णांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
मालेगाव शहरात करोनाची रुग्णसंख्या वाढून २५३ झाली आहे. या सर्व रूग्णांवर (कॉविड-19) रुग्णालयात उपचार सुरू आहे. रात्री उशिरा १५२ रुग्णांचे अहवाल प्राप्त झाले असून यातील ४४ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले होते त्यात ३ महिन्याच्या चिमुकलीचाही समावेश होता. त्यात २७ जणांची भर पडली आहे. नाशिक जिल्ह्यात करोनाची रुग्णसंख्या २७६ वर पोहचली असून धोका वाढला असल्याचे चित्र आहे. तर मृतांची संख्या १३ इतकी झाली आहे.