• Download App
    चमत्कार ! 107 वर्षांच्या वृद्धेने हरवले चिनी विषाणूला ; 105 वर्षांपुर्वी हिलाच गाठले होते स्पॅनिश विषाणूने | The Focus India

    चमत्कार ! 107 वर्षांच्या वृद्धेने हरवले चिनी विषाणूला ; 105 वर्षांपुर्वी हिलाच गाठले होते स्पॅनिश विषाणूने

    वृत्तसंस्था
    माद्रिद :  आसपासचे अनेक तरुण चिनी विषाणूला बळी पडत असताना स्पेनमधल्या 107 वर्षीय वृद्धेनं मात्र या विषाणूवरच मात करण्यात यश मिळवलं आहे. होय…तब्बल 107 वर्षांची ही वृद्ध स्त्री कोरोनाबाधित झाल्यानंतर त्यातून पूर्ण बरी झाली आहे. चमत्काराची गोष्ट एवढीच नसून पुढे आहे. हीच वृद्ध स्त्री जेव्हा जेमतेम पाच वर्षांची चिमुरडी मुलगी होती तेव्हा तिला त्यावेळी आलेल्या स्पॅनिश फ्लूच्या साथीनेही गाठले होते. या पाच वर्षाच्या मुलीचे त्या विषाणूला त्याहीवेळी हरवले होते…आणि आता कदाचित जीवनाच्या अखेरच्या टप्प्यातही तीने चिनी विषाणूला दाद दिलेली नाही. 
    स्पेनमधल्या द ऑलिव्ह प्रेस या इंग्रजी वृत्तपत्राने ही बातमी दिली आहे. अँना डेल वॅले हे त्या स्पॅनिश वृद्धेचे नाव आहे. यांचा जन्म ऑक्टोबर 1913 मध्ये झाला होता. त्यांच्या जन्मानंतर पाचव्या वर्षी म्हणजे 1918 साली स्पेनमध्ये विषाणूच्या तापाची जोरदार साथ आली. ती तब्बल 36 महिने टिकली. त्यावेळच्या जगातल्या एक तृतीयांश लोकसंख्येला या साथीच्या रोगाने गाठले होते. या साथीचा संसर्ग अँनाला झाला होता. पण तेव्हा अँना त्यातून सुखरुप बरी झाली होती.
    स्पॅनिश मीडियाच्या माहितीनुसार, अँना तिच्या कुटुंबासह रोंडा येथे वास्तव्यास आहे. प्रकृती बिघडल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले असता ती कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले. मात्र काही दिवसांच्य उपचारानंतर ती पूर्ण बरी झाली आणि तिला घरी सोडण्यात आले. या चमत्कारामुळे चिनी विषाणूवर मात करणारी ती स्पेनमधील सर्वात वृद्ध व्यक्ती ठरली आहे. तर जागतिक स्तरावर हॉलंडमधल्या आणखी एका 107 वर्षांच्याच कोर्नोलिया रास या दुसऱ्या एका वृद्ध महिलेबरोबर तिचा क्रमांक लागला आहे. कोर्नोलियानेदेखील अँनाप्रमाणेच चिनी विषाणूला हरवले आहे. 
    अँनाचे जावई पाकी सॅन्चेझ यांनी सांगितले की, रुग्णालयातल्या नर्स आणि डॉक्टर यांच्याविषयी अँना कृतज्ञ आहे. या सर्वांनी तिची चांगली काळजी घेतली. म्हातारपणामुळे आम्हीदेखील घरी तिची काळजी घेतो. तिचा आहार खूप कमी असून दिवसातून एकदाच क्वचित दोनदा ती खाते. वॉकरवर काहीवेळ चालतेदेखील. 
    दरम्यान, स्पेनमधल्याच 101 वर्षांच्या आणखी एका वृद्ध स्त्रीनेही चिनी विषाणूवर मात केली आहे. स्पेनमधल्या कोरोनाबाधित बळींची संख्या आतापर्यंत तब्बल 22 हजार 524 इतकी मोठी आहे. तर 92 हजार 355 कोरोनाबाधितांना बरे झाल्यानंतर रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. अमेरिकेतील जॉन हॉपकीन्स युनिव्हर्सिटीच्या मते चिनी विषाणूमुळे मृत पावलेल्यांची संख्या जगात 1 लाख 95 हजार असून जगातले 27 लाख लोक सध्या कोरोनाबाधित आहेत. यापैकी 7 लाख 81 हजार जण चिनी विषाणूच्या आजारातून बरे झाले आहेत.  
    – आसपासचे अनेक तरुण चिनी विषाणूला बळी पडत असताना स्पेनमधल्या 107 वर्षीय वृद्धेनं मात्र या विषाणूवरच मात करण्यात यश मिळवलं आहे. होय…तब्बल 107 वर्षांची ही वृद्ध स्त्री कोरोनाबाधित झाल्यानंतर त्यातून पूर्ण बरी झाली आहे. चमत्काराची गोष्ट एवढीच नसून पुढे आहे. हीच वृद्ध स्त्री जेव्हा जेमतेम पाच वर्षांची चिमुरडी मुलगी होती तेव्हा तिला त्यावेळी आलेल्या स्पॅनिश फ्लूच्या साथीनेही गाठले होते. या पाच वर्षाच्या मुलीचे त्या विषाणूला त्याहीवेळी हरवले होते…आणि आता कदाचित जीवनाच्या अखेरच्या टप्प्यातही तीने चिनी विषाणूला दाद दिलेली नाही. 
    स्पेनमधल्या द ऑलिव्ह प्रेस या इंग्रजी वृत्तपत्राने ही बातमी दिली आहे. अँना डेल वॅले हे त्या स्पॅनिश वृद्धेचे नाव आहे. यांचा जन्म ऑक्टोबर 1913 मध्ये झाला होता. त्यांच्या जन्मानंतर पाचव्या वर्षी म्हणजे 1918 साली स्पेनमध्ये विषाणूच्या तापाची जोरदार साथ आली. ती तब्बल 36 महिने टिकली. त्यावेळच्या जगातल्या एक तृतीयांश लोकसंख्येला या साथीच्या रोगाने गाठले होते. या साथीचा संसर्ग अँनाला झाला होता. पण तेव्हा अँना त्यातून सुखरुप बरी झाली होती.
     
    स्पॅनिश मीडियाच्या माहितीनुसार, अँना तिच्या कुटुंबासह रोंडा येथे वास्तव्यास आहे. प्रकृती बिघडल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले असता ती कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले. मात्र काही दिवसांच्य उपचारानंतर ती पूर्ण बरी झाली आणि तिला घरी सोडण्यात आले. या चमत्कारामुळे चिनी विषाणूवर मात करणारी ती स्पेनमधील सर्वात वृद्ध व्यक्ती ठरली आहे. तर जागतिक स्तरावर हॉलंडमधल्या आणखी एका 107 वर्षांच्याच कोर्नोलिया रास या दुसऱ्या एका वृद्ध महिलेबरोबर तिचा क्रमांक लागला आहे. कोर्नोलियानेदेखील अँनाप्रमाणेच चिनी विषाणूला हरवले आहे. 
     
    अँनाचे जावई पाकी सॅन्चेझ यांनी सांगितले की, रुग्णालयातल्या नर्स आणि डॉक्टर यांच्याविषयी अँना कृतज्ञ आहे. या सर्वांनी तिची चांगली काळजी घेतली. म्हातारपणामुळे आम्हीदेखील घरी तिची काळजी घेतो. तिचा आहार खूप कमी असून दिवसातून एकदाच क्वचित दोनदा ती खाते. वॉकरवर काहीवेळ चालतेदेखील. 
     
    दरम्यान, स्पेनमधल्याच 101 वर्षांच्या आणखी एका वृद्ध स्त्रीनेही चिनी विषाणूवर मात केली आहे. स्पेनमधल्या कोरोनाबाधित बळींची संख्या आतापर्यंत तब्बल 22 हजार 524 इतकी मोठी आहे. तर 92 हजार 355 कोरोनाबाधितांना बरे झाल्यानंतर रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. अमेरिकेतील जॉन हॉपकीन्स युनिव्हर्सिटीच्या मते चिनी विषाणूमुळे मृत पावलेल्यांची संख्या जगात 1 लाख 95 हजार असून जगातले 27 लाख लोक सध्या कोरोनाबाधित आहेत. यापैकी 7 लाख 81 हजार जण चिनी विषाणूच्या आजारातून बरे झाले आहेत.  

    Related posts

    Slap on USA : व्यापाराची लालूच + काश्मीरप्रश्नी “मध्यस्थी” नकोय; महासत्ता अमेरिकेच्या अध्यक्षांची “ऑफर” भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने फेटाळली!!

    मोदींची आदमपूर हवाई तळाला भेट; बहादूर जवानांविषयी व्यक्त केली कृतज्ञता!!

    PM Modi च्या भाषणात no between the lines; पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान-दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!