• Download App
    गुजरातने चीनचे रेकॉर्ड तोडले; चार शहरांमध्ये ६ दिवसांत २२०० बेडची ४ हॉस्पिटल केली तयार...!! | The Focus India

    गुजरातने चीनचे रेकॉर्ड तोडले; चार शहरांमध्ये ६ दिवसांत २२०० बेडची ४ हॉस्पिटल केली तयार…!!

    विशेष  प्रतिनिधी

    अहमदाबाद : कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी चीनने १००० बेडचे हॉस्पिटल १० दिवसांत बांधल्याचे कौतूक झाले. त्यानंतर दावे खोडून काढणारे व्हिडीओही व्हायरल झाले पण गुजरात सरकारने असे कोणतेही अतिशोयक्त दावे न करता कोरोना रुग्णांसाठी आणि संशयितांच्या उपचारांसाठी २२०० बेडची सोय असणारी चार हॉस्पिटल चार शहरांमध्ये ६ दिवसांमध्ये तयार केली. यात अहमदाबाद १२००, सुरत ५००, बडोदे २५० आणि राजकोटमध्ये २५० बेडची हॉस्पिटल तयार करण्यात आले. WHO आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालय यांच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, ही हॉस्पिटल तयार करण्यात आली आहेत. राज्याच्या महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव पंकज कुमार यांच्याकडे ही हॉस्पिटल चालविण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

    Related posts

    इराणच्या युद्धात अमेरिकन प्रणित NATO संघटना फेल; पण आता पाकिस्तानचा इस्लामिक NATO बनवायचा “डाव”!!

    भाजपवाल्यांना त्यांचा डीएनए वाटतो विरोधकांचा; पण सत्तेवर राहण्यात मोदी नंबर 1 वर!!

    अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनीच पाडली त्यांच्या पक्षात फुट; प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे टार्गेटवर!!