• Download App
    खरा कर्मयोगी: वडीलांच्या निधनाची बातमी समजल्यानंतरही योगी आदित्यनाथ यांनी सुरू ठेवली बैठक | The Focus India

    खरा कर्मयोगी: वडीलांच्या निधनाची बातमी समजल्यानंतरही योगी आदित्यनाथ यांनी सुरू ठेवली बैठक

    उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपण खरे कर्मयोगी असल्याचे दाखवून दिले. वडीलांच्या निधनाची बातमी समजल्यानंतरही उत्तर प्रदेशातील २३ कोटी जनतेसाठी सुरू असलेली कोरोनाविरुध्दची लढाई त्यांनी सुरूच ठेवली. लॉकडाऊनच्या नियमाचे पालन करण्यासाठी ते वडीलांच्या अंत्यसंस्कारालाही गेले नाहीत.
    वृत्तसंस्था
    लखनऊ : वडीलांच्या निधनाची बातमी मिळाली तरी चीनी व्हायरसविरुध्द लढाई सुरू ठेवत उत्तर प्रदेशातील जनतेसाठी काम करण्यासाठी योगी आदित्यनाथांनी आपली बैठक सुरूच ठेवली. अंत्यसंस्कारासाठी आपण येऊ शकत नाही. भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ असल्याचे भावुक पत्रही त्यांनी आईला लिहिले.
    उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या वडीलांचे सोमवारी निधन झाले. मात्र, आपण लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करत असल्याने अंत्यसंस्काराला येऊ शकत नाही. कमी कमी लोकांची उपस्थिती ठेवत अंत्यविधी पार पाडावा असे पत्रही त्यांनी आईला लिहिले.
    योगी आदित्यनाथांचे वडील आनंदसिंह बिश्त यांनी आज दिल्ली येथील एम्समध्ये अखेरचा श्वास घेतला. त्यांना वडीलांच्या मृत्यूची बातमी समजली त्यावेळी ते कोरोनासंदर्भात एक बैठक घेत होते. निरोप मिळाल्यावर अधिकाºयांनी योगाी यांना अंत्यसंस्कारासाठी जाण्यासाठी तयारी सुरू केली. मात्र, लॉकडाऊन तोडून आपण जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
    आईला त्यांनी अत्यंत भावनिक पत्र लिहिले. त्यात ते म्हणतात, पूजनीय वडीलांच्या जाण्याने मला अत्यंत दु:ख झाले आहे. आयुष्यात प्रामाणिकपणा, कठोर परिश्रम आणि निस्वार्थ तसेच समर्पण भावनेने लोककल्याणाचेकार्य करण्याची शिकवण त्यांनी बालपणापासून दिली. अखेरच्या क्षणी त्यांचे दर्शन घेण्याची अत्यंत इच्छा होती. मात्र, कोरोनाच्या साथी संपूर्ण दश लढत आहे. उत्तर प्रदेशातील २३ कोटी जनतेची जबाबदारी माझ्यावर आहे. मी अखेरचे दर्शन घेऊ शकलो नाही. लॉकडाऊन यशस्वी करणे आणि कोरोनाचा पराभव करणे यामध्ये लढत असल्यानेमला अंत्यविधीला येत येणार नाही. पूजनीय आई आणि कुटुंबातील सर्वसदस्यांना विनंती करतो की लॉकडाऊनचे पालन करून कमीत कमी लोकांत अत्यंसंस्कार पार पाडावेत. पूजनीय वडीलांच्या स्मृतीस कोटी कोटी प्रणाम. लॉकडाऊननंतर दर्शनासाठी येईल.

    Related posts

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…

    राहुल गांधी म्हणतात, भारताची अर्थव्यवस्था resilient, production based बनवायला हवी, पण “तशी” अर्थव्यवस्था बनवायला कुणी अडवले होते??