विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उथळ आणि उठवळ प्रवक्ते सचिन सावंत यांनी राज्यपाल भगतसिंह कोशियारी परिधान करीत असलेल्या टोपीवरून अभद्र टीका केल्याने कोशियारींचे मूळ राज्य उत्तराखंडमध्ये संताप व्यक्त होत आहे.
सावंतांनी आगाऊपणे ट्विट करून राज्यपाल टोपी काढून विचार करतील तर त्यांना जबाबदारीची जाणीव होईल आणि ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेवर नियुक्ती करतील. राज्यपालांची टोपीच त्यांच्या कर्तव्याआड येत आहे, असे ट्विट केले. कोशियारी काळी टोपी परिधान करतात ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची टोपी आहे, असे समजून सावंत यांनी हे ट्विट केले. या बाबतीत सावंतांना नुसती माहितीच नाही तर ते उठवळ आणि वावदूकही आहेत.
कोशियारी परिधान करतात ती टोपी उत्तराखंडचे सर्व लोक नियमित परिधान करतात. देवभूमीच्या अनेक प्रतिकांपैकी ही टोपी एक प्रतिक आहे. या टोपीचा लष्करातील कुमाँऊ आणि गढ़वाल रेजिमेंटशी संबंध आहे, कोशियारींच्या टोपीचा अपमान हा देवभूमीचा आणि लष्कराचाही अपमान आहे, असे ट्विट उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी केले आहे.
महाराष्ट्र कांग्रेस के प्रवक्ता द्वारा महाराष्ट्र के राज्यपाल एवं हमारे आदरणीय श्री @BSKoshyari जी पर की गई अभद्र टिप्पणी देवभूमि की संस्कृति के अहम प्रतीक चिन्ह के अपमान के साथ देश की फौज का भी अपमान है; ज्ञात हो कि इस टोपी का संबंध गढ़वाल रेजिमेंट और कुमाऊँ रेजीमेंट से रहा है । pic.twitter.com/Jf7FmXAbLh
— Trivendra Singh Rawat (@tsrawatbjp) April 30, 2020
कोशियारींची टोपी संघाच्या टोपीसारखी दिसत असली तरी तिचा संघाशी काहीही संबंध नाही. असे असताना सावंतांनी आपली नसलेली बुद्धी पाजळत अकारण टीका करून वाद ओढवून घेतला आहे.