• Download App
    कोविड १९ डाटा; गुजरातमधले "home affair" | The Focus India

    कोविड १९ डाटा; गुजरातमधले “home affair”

    विशेष प्रतिनिधी

    गांधीनगर : पतीच्या कंपनीने पुरविलेल्या app वर कोविड १९ चा डाटा गोळा करणाऱ्या गुजरातच्या आरोग्य सचिव डॉ. जयंती रवी यांना अखेर राज्य सरकारने बाजूला केले आहे.

    राज्यातील कोविड १९ ची परिस्थिती हाताबाहेर जात असताना सरकारने ही कारवाई केली. डॉ. जयंती रवी या राज्याच्या आरोग्य सचिव या नात्याने कोविड १९ ची परिस्थिती हाताळत होत्या. त्या रोजचे प्रेस ब्रिफिंगही घेत होत्या. त्यांच्या जागी आता राज्याचे महसूल सचिव पंकज कुमार हे कोविड १९ संबंधीचा सर्व चार्ज संभाळतील.

    जयंती रवी या २००२ मध्ये कारसेवकांचे गोध्रा जळीत हत्याकांड घडले तेव्हा तेथील जिल्हाधिकारी होत्या. २००४ नंतर त्यांना सोनिया गांधींनी राष्ट्रीय सल्लागार समितीवर घेतले होते. ही समितीच त्या काळात पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना सल्ला देण्यासाठी नेमली होती. सोनिया गांधीच या समितीच्या अध्यक्ष होत्या.

    जयंती रवी यांचे पती रवी गोपालन यांची आर्ग्यूसॉफ्ट नावाची सॉफ्टवेअर कंपनी आहे. त्यांनी गुजरात सरकारला पुरविलेल्या “डॉ. टेको” (DrTecho) या app वर कोविड १९ चा राज्यभरातील डाटा गोळा करण्यात येतो आहे. सर्व आशा वर्करच्या मोबाईलमध्ये हे app डाऊनलोड करून घेतले आहे.

    प्रत्यक्षात सरकारबरोबर mou करूनच हे app वापरले पाहिजे, असा आक्षेप गुजरातचे आरोग्य आयुक्त जय प्रकाश यांनी घेतला. या नंतर सरकारने डॉ. जयंती रवी यांना कोविड १९ च्या कामामधून बाजूला केले.

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Operation sindoor मध्ये भारतीय सैन्य दलांनी 100 + दहशतवादी, पाकिस्तानचे 35 ते 40 अधिकारी आणि सैनिक मारले!!