विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोरोना संकटावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारत मात करेल, असा विश्वास ८३% भारतीयांनी व्यक्त केला आहे. आयएएनएस – सी वोटर गँलप इंटरनँशनल असोसिएशन यांच्या सहयोगाने कोविड १९ ट्रँकर वेव्ह २ सर्वे करण्यात आला. हा ट्रँक आठवडाभर ठेवण्यात आला होता. या सर्वेतून देशातील ८३% जनतेचा मोदी सरकारवर विश्वास असल्याचे दिसून आले. कोरोना प्रादूर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनसह मोदी सरकार प्रभावी उपाय करत आहे, असे ८३.५% जनतेला वाटते, तर फक्त ९.४% जनता मोदी सरकारच्या उपाययोजनांवर समाधानी नाही. ६४.४ % लोक मोदी सरकारच्या पाठिशी ठामपणे उभे आहेत. १७.३% लोकांना सरकारचे प्रयत्न अपुरे वाटतात. या आधी १६, १७ मार्चला अशाच प्रकारचा सर्वे घेण्यात आला होता. त्यातही मोदी सरकारच्या प्रयत्नांना जनतेने सकारात्मक दाद दिली होती. संगणकाला जोडलेल्या फोन कॉलच्या आधारे हे सर्वे घेण्यात आले. याचे डाटा विश्लेषणही त्या आधारे करण्यात आले. “कोरोना प्रादूर्भावामुळे उत्पन्न झालेली परिस्थित भारत सरकार उत्तमरित्या हाताळत आहे का?,” असा मूळ प्रश्न होता. त्याला लोकांनी भरभरून सकारात्मक प्रतिसाद दिला.