वृत्तसंस्था
वॉशिंग्टन डीसी : वॉशिंग्टन येथील वकील लैरी क्लेमन यांनी चीनच्या विरोधात तब्बल 2 खर्व डॉलर एवढ्या प्रचंड रकमेचा दावा दाखल केला आहे. चीनने नॉवेल कोरोना विषाणूची निर्मिती केली आणि तो जगात सोडला ज्यामुळे 3 लाख 34 हजारांपेक्षा जास्त लोकांना संसर्ग झाला, हा आरोप चीनवर ठेवण्यात आला आहे.
क्लेमन आणि त्यांचा सल्लागार गट, टेक्सास येथील ‘फ्रीड्म अँड बज’ कंपनीने अमेरिकेच्या जिल्हा न्यायालयात हा दावा दाखल केला आहे. जैविक युध्दाचा भाग म्हणून चीनने कोरोना विषाणूची निर्मीती करुन अमेरिकी कायदा, आंतरराष्ट्रीय नियम तसेच अनेक करारांचा भंग केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
चीनने अशी जैविक शस्त्रे बंदी घालण्याच्या करारावर सहमती दर्शविल्यामुळे, हे चीनच्या पीपल्स रिपब्लिकचे अधिकृत सरकारी कृत्य असू शकत नाही. त्यामुळे या दाव्यापासून ते दूर राहू शकत नाहीत, असे या खटल्यात म्हटले आहे. दरम्यान, चीनचे शत्रू असल्याचे समजल्या जाणार्या राष्ट्रांतील अमेरिकी नागरिक, इतर व्यक्ती आणि संस्थांना ठार मारण्यासाठी प्रयोगशाळेत कोरोना विषाणू टिकवून ठेवण्याचा चीनचा हेतू होता. चीनमधील वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीने सोडलेल्या विषाणूमुळे जगभर त्याची साथ पसरली, असे या तक्रारीत म्हटले आहे.
‘कोविड -१९ विषाणू एका नियोजित आणि अनपेक्षित वेळी सोडण्यात आला असला तरी चीनच्या कथित शत्रूंच्या विरूद्ध वापरण्यासाठी ते जैविक शस्त्र म्हणून तयार केले गेले होते, जे अमेरिकी लोकांपुरते मर्यादित नव्हते. हा संसर्गजन्य रोग चीनमध्ये आणण्यासाठी चीन सरकारने अमेरिकी सैनिकांना जबाबदार धरल्यानंतर अमेरिकी सरकारने यापूर्वीच बीजिंगला कोरोना या साथीच्या आजारासाठी दोषी ठरविले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने असे निदर्शनास आणून दिले की चीनी सरकारने बराच काळ या विषाणूचा प्रादुर्भाव लपविला. ज्यांनी याची वाच्यता करण्याचा प्रयत्न केला त्यांना शिक्षा करण्यात आली.
क्रुर, बेजबाबदार दुर्लक्ष आणि द्वेषयुक्त कृत्यांमुळे चीनी सरकारकडे नुकसान भरपाई मागितली असल्याचे क्लेमन यांनी म्हटले आहे. चिनी लोक चांगले आहेत, परंतु त्यांचे सरकार चांगले नसल्याने त्यांनी मोबदला द्यायलाच हवा, अशी त्यांची मागणी आहे.
क्लेमन यांच्या खटल्यानुसार, शाळा बंद झाल्याने व खेळ रद्द झाल्यामुळे गेल्या आठवड्याच्या शेवटी ‘बझ फोटोज’ कंपनीचे अंदाजे 50 हजार डॉलर्सचे नुकसान झाले आणि कामगारांना काढून टाकण्यास भाग पडले. “