• Download App
    कोरोना बाहेर पसरवा म्हणणाऱ्या आयटी इंजिनिअरला बेंगळूरूमध्ये अटक | The Focus India

    कोरोना बाहेर पसरवा म्हणणाऱ्या आयटी इंजिनिअरला बेंगळूरूमध्ये अटक

    विशेष प्रतिनिधी

    बेंगळुरू : “हातात हात घ्या. बाहेर जा. शिंका आणि समाजात कोरोना व्हायरस पसरवा,” असा “संदेश” सोशल मीडिया साइटवरून देणाऱ्या आयटी इंजिनिअरला अटक करण्यात आली आहे. मुजीब महंमद असे त्याचे नाव असून तो इन्फोसिसमध्ये सिनिअर टेक्नॉलॉजी आर्किटेक्ट होता. कंपनीने त्याला प्राथमिक चौकशीनंतर नोकरीतून काढून टाकले आहे. मुजीब महंमदची चौकशी चालू आहे, अशी माहिती शहराचे सह पोलिस आयुक्त संदीप पाटील यांनी दिली. तर कंपनीच्या कर्मचाऱ्यांची सोशल मीडिया अकाउंटची चौकशी करण्यात येत आहे, अशी माहिती इन्फोसिसकडून देण्यात आली. सामाजिक दायित्वाला कंपनी प्राधान्य देते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

    Related posts

    Vote chori : राहुल गांधींचा “हायड्रोजन बॉम्ब” आला; पण कोर्टाची पायरी चढायला घाबरला!!

    Modi @75 : रिटायरमेंटची चर्चा derail, मोदींसमोरच्या नव्या आव्हानांची चर्चा पुन्हा track वर!!

    दिवस ढळला, मोदींच्या रिटायरमेंटची मावळली आशा; पण विरोधकांसाठी खुली झाली “संधीची” नवी दिशा!!