राजकारण बाजुला ठेऊन चीनी व्हायरसविरुध्दच्या लढाईत सर्वपक्षीय एकजुटीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक पाऊल पुढे टाकले आहे. रविवारी त्यांनी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि एच. डी. देवेगौडा यांच्यासह कॉँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव यांच्याशी चर्चा केली.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : राजकारण बाजुला ठेऊन चीनी व्हायरसविरुध्दच्या लढाईत सर्वपक्षीय एकजुटीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक पाऊल पुढे टाकले आहे. रविवारी त्यांनी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि एच. डी. देवेगौडा यांच्यासह कॉँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि समाजवादी पक्षाचेअखिलेश यादव यांच्याशी चर्चा केली.
देशात चीनी व्हायरसचा धोका वाढला आहे. रुग्णांची संख्या दिवसोंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय पातळीवर निर्णय घ्यावे लागणार आहेत. केंद्र आणि सर्व राज्यांना एकत्र येऊन काम करावे लागणार आहे. यासाठी पंतप्रधान बुधवारी सर्वपक्षीय नेत्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा करणार आहेत. त्याच्या आधी रविवारी त्यांनी देशातील प्रमुख नेत्यांशी चर्चा केल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
चिनी विषाणूविरोधात सुरू असलेल्या लढाईअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व राजकीय पक्ष आणि समाजातील प्रत्येक वगार्ला एकाच मंचावर आणण्याच्या प्रयत्नात आहेत. हेच एकजुटीचे प्रयत्नांचा आवाका अधिक व्यापक करत मोदी यांनी रविवारी माजी राष्ट्रपती आणि माजी पंतप्रधानांशी चर्चा केली. या व्यतिरिक्त त्यांनी विरोधी पक्षांचे नेत्यांशी देखील चर्चा केली.
पंतप्रधान कार्यालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधानांनी सर्वप्रथम माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याशी फोनवर चर्चा करत करोनावर मात करण्यासाठी काय उपाययोजना करण्यात येत आहे याबाबत माहिती दिली. त्यानंतर मोदी यांनी माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्याशी फोनवर चर्चा केली. त्यांनी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह आणि एच. डी. देवेगौडा यांच्याशी देखील फोनवर चर्चा केली.
‘द हिंदू’ ने दिलेल्या वृत्तानुसार देशात सुरू असलेला लॉकडाऊन टप्याटप्याने उठविण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. त्यामध्ये कोणतीही अडचण येऊ नये यासाठी सर्व राज्यांचे सहकार्य आवश्यक आहे. पंतप्रधानांनी गेल्या आठवड्यता सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांशी व्डिीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली होती. आज त्यांनी देशातील मान्यवर नेत्यांशी फोनवर चर्चा केली यामध्ये कॉँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते मुलायमसिंह यादव, माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, ओरिसाचे मुख्यमंत्रक्ष नवीन पटनायक, द्रुमुकचे प्रमुख एम. के. स्टॅलिन, तेलंगणचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव, अकाली दलाचे प्रकाशसिंग बादल यांच्यासह माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचाही समावेश होता.