• Download App
    कोरोनाला रोखण्यासाठी नाकपुड्यात लावण्याच्या जेलचे संशोधन सुरु | The Focus India

    कोरोनाला रोखण्यासाठी नाकपुड्यात लावण्याच्या जेलचे संशोधन सुरु

    वृत्तसंस्था

    मुंबई : आयआयटी मुंबईच्या जैवविज्ञान आणि जैवअभियांत्रिकी (डीबीबी) विभागाने कोरोना विषाणूच्या संसर्गाचे मुख्य प्रवेशद्वार असलेल्या नाकपुड्यांच्या आतल्या भागात लावण्यासाठी जेल विकसित करण्याचे संशोधन चालू केले आहे. या जेलमुळे नाकातून शरीरात प्रवेश करणाऱ्या कोरोनाला रोखता येणार आहे. या शोधामुळे कोविड-19 चा सामुदायिक प्रसार कमी करण्यास मदत होणार आहे. अर्थात ही जेल तयार होण्यासाठी आणखी 9 महिन्यांचा कालावधी लागणार आहे.

    कोरोनाचा विषाणू पसरू नये, तो पकडणे शक्य व्हावे तसेच त्याला निष्क्रीय करता यावे, यासाठी देशातल्या अनेक संस्था, संशोधक आणि कंपन्या काम करत आहेत. यात विज्ञान आणि अभियांत्रिकी संशोधन मंडळ (एसईआरबी), विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग (डीएसटी), आयआयटी मुंबईतील जैवविज्ञान आणि जैवअभियांत्रिकी (डीबीबी) यांच्या संयुक्त विद्यमाने कोविड-19 चा कारक घटक शोधण्यावर भर दिला जात आहे.

    कोविड-19 च्या साथीच्या या रुग्णांची काळजी घेणाऱ्या डॉक्टर आणि परिचारक यांच्या आरोग्याला जास्त धोका निर्माण होतो. त्यामुळे कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यताही वाढते. सार्स-कोव्ही-2 या विषाणूंचा प्रसारामागची कारणे लक्षात घेवून कोविड-19 प्रसार मर्यादित करण्यासाठी काय करता येईल, याचा विचार केला जात आहे. हे विषाणू प्रामुख्याने रुग्णाच्या फुफ्फुसांमधल्या पेशींमध्ये पुन्हा तयार होत आहेत. त्यामुळे त्यांना फुफ्फुसापर्यंत पोहोचण्यापूर्वीच रोखणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ते नाकामध्येच निष्क्रिय करण्याची आवश्यकता आहे.

    आणखी एक गोष्ट म्हणजे जैविक रेणू एकत्रित करून त्या विषाणूंना निर्मलकाच्या मदतीने निष्क्रिय करणे शक्य आहे, असा विचार करून नाकातल्या मधल्या पोकळीमध्ये म्हणजेच नाकपुड्यांमधल्या जागेत लावण्यासाठी जेल विकसित करता येईल, असा विचार यामागे आहे.

    आयआयटी मुंबई यांच्या जैवविज्ञान आणि जैवअभियांत्रिकी विभागातले प्रा. किरण कोंडाबागिल, प्रा. रिंटी बॅनर्जी, प्रा. आशुतोष कुमार आणि प्रा. शामिक सेन या प्रकल्पामध्ये सहभागी झाले आहेत. विषाणूशास्त्र, संरचनात्मक जैवशास्त्र, जैवभौतिकी, जैवसामुग्री आणि औषध वितरण या क्षेत्रातील तज्ञांच्या कौशल्यानुसार आणि तंत्रज्ञानाच्या आधारे आगामी 9 महिन्यांमध्ये असे जेल तयार होईल, अशी अपेक्षा आहे

    Related posts

    मनोज जरांगेंच्या आंदोलनात पवार + ठाकरेंचे नेते घुसले; पण ओबीसीतून मराठ्यांना आरक्षणाबाबत पवार + ठाकरेंची भूमिका संशयाच्या घेण्यात!!

    जेव्हा संघाने चालविल्या होत्या काँग्रेसच्या NSUI अधिवेशनसाठी खानावळी; डॉ. मोहन भागवतांनी सांगितली त्यांची कहाणी!!

    Dr. Mohan Bhagwat : संघ सगळं ठरवत असता, तर (भाजपचे अध्यक्ष निवडायला) एवढा वेळ लागला असता का??; कानपिचक्या की सूचना??