• Download App
    कोरोनापासून वाचविण्यासाठी मुस्लिम महिलांनी केली प्रभू रामचंद्रांची आरती | The Focus India

    कोरोनापासून वाचविण्यासाठी मुस्लिम महिलांनी केली प्रभू रामचंद्रांची आरती

    शाहिनबाग सारख्या आंदोलनाच्या माध्यमातून मुस्लिम महिलांची हिंदूविरोधी प्रतिमा पुढे आणण्याचा प्रयत्न केला जात असताना वाराणसीतील मुस्लिम महिलांनी हिंदू- मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडविले आहे. कोरोना व्हायरसपासून वाचविण्यासाठी मुस्लिम महिलांनी प्रभु रामचंद्रांची आरती केली.


    विशेष प्रतिनिधी

    वाराणसी : शाहिनबाग सारख्या आंदोलनाच्या माध्यमातून मुस्लिम महिलांची हिंदूविरोधी प्रतिमा पुढे आणण्याचा प्रयत्न केला जात असताना वाराणसीतील मुस्लिम महिलांनी हिंदू- मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडविले आहे. कोरोना व्हायरसपासून वाचविण्यासाठी मुस्लिम महिलांनी प्रभु रामचंद्रांचीआरती केली.

    नवभारत टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे रामनवमीच्या पवित्र दिवशी मुस्लिम महिला राममंदिरात आल्या. त्यांनी श्रीरामाची आरती केली. उर्दू भाषेत लिहिलेल्या श्रीरामांच्या आतीचे पठण केले. त्याचबरोबर हनुमान चालिसा पाठ करून कोरोनारुपी राक्षसाच्या दहशतीपासून वाचविण्याची प्रार्थना केली.

    मुस्लिम महिला फाऊंडेशनच्या वतीने रामनवमीनिमित्त सर्वधर्मसमभावाची शिकवण देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, लॉकडाऊनच्या नियमावलीमुळे मुस्लिम महिला फाऊंडेशनच्या राष्ट्रीय अध्यक्ष नाजनीन अन्सारी यांच्यासोबत केवळ चार महिला सहभागी झाल्या होत्या. सर्वांनी मास्कही परिधान केले  होते. त्यांनी ‘भऐ प्रगट कृपाला दीन दयाला’ ही आरती गायली.

    नाजनीन अन्सारी म्हणाल्या तबलिगी जमातीच्या धर्मांध मौलानांनी पूर्ण देशाला संकटात टाकण्याचे पाप केले आहे. त्यांना या पापातून प्रभू श्रीरामच मुक्ती देऊ शकतील. त्यामुळे या कठीण प्रसंगी संपूर्ण देशाने रामनामाचा जप करायला हवा.

    Related posts

    राहुल गांधींना कर्नाटकातली दिसली मतदार यादीची “चोरी”; मालेगावातली नाही दिसली शिरजोरी; पण निवडणूक आयोगाच्या आव्हानापासून काढली पळपुटी!!

    राहुल गांधींना कर्नाटकातली दिसली मतदार यादीची “चोरी”; पण मालेगावातली नाही दिसली शिरजोरी; शिवाय कर्नाटकातले जात सर्वेक्षणही जुन्याच मतदार यादीनुसार!!

    राहुल गांधींना महादेवपुरा मतदारसंघातली दिसली “चोरी”; पण मालेगावातली नाही दिसली शिरजोरी!!