‘चौकीदार चोर हैै’ सारख्या आरोपांवरून जनतेने थप्पड लगावली असतानाही कोरोनाच्या धास्तीत कॉँग्रेसचे माजी अध्यक्ष राहूल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आरोपबाजी सुरूच ठेवली आहे. जनतेचे मनोधैर्य उंचावण्याचा प्रयत्न पंतप्रधान करत असताना गांधी यांच्या आरोपांमुळे जनतेमध्ये विनाकारण धास्ती निर्माण होत आहे. सोशल मीडियावरून राहूल गांधी यांना चांगलेच फैैलावरही घेण्यात येत आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : ‘चौकीदार चोर हैै’ सारख्या आरोपांवरून जनतेने थप्पड लगावली असतानाही कोरोनाच्या धास्तीत कॉँग्रेसचे माजी अध्यक्ष राहूल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आरोपबाजी सुरूच ठेवली आहे. जनतेचे मनोधैर्य उंचावण्याचा प्रयत्न पंतप्रधान करत असताना गांधी यांच्या आरोपांमुळे जनतेमध्ये विनाकारण धास्ती निर्माण होत आहे. सोशल मीडियावरून राहूल गांधी यांना चांगलेच फैैलावरही घेण्यात येत आहे.
पतंप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर मास्कच्या निर्यातीवरून राहूल गांधी यांनी बेछुट आरोप केले आहेत. करोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने व्हेंटिलेटर्स आणि सर्जिकल मास्कसारखी पुरेसी जीवरक्षक उपकरणं राखून का ठेवली नाहीत? असा सवाल त्यांनी केला आहे. हा गुन्हेगारी कट तर नाही ना असा संशयही त्यांनी ट्विटच्या माध्यमातून व्यक्त केला आहे. याबाबतचा एक अहवाल शेअर करीत राहुल गांधी म्हणाले, जागतिक आरोग्य संघटनेने तीन आठवड्यापूर्वीच व्हेंटिलेटर्स आणि सर्जिकल मास्कचा पुरेसा साठा करुन ठेवण्याच्या सूचना केलेल्या होत्या. मात्रए तरीही केंद्र सरकारने तब्बल तीन आठवड्यानंतर े या उपकरणांच्या नियार्तीवर बंदी घातली. जनतेच्या जीवाशी केलेला हा खेळ कोणत्या ताकदीच्या जोरावर करण्यात आला. हा गुन्हेगारी कट नाही का?
जागतिक आरोग्य संघटनेने २७ फेब्रुवारी रोजी सर्व देशांसाठी काही मार्गदर्शक तत्वे प्रसिद्ध केली होती. यामध्ये म्हटलं होतं की, सध्या जगातील करोनाच्या प्रादुभार्वाची परिस्थिती पाहता मेडिकल मास्क आणि व्हेंटिलेटर्सची कमतरता आहे. त्याचबरोबर सर्जिकल गाऊन आणि गॉगल्सही लवकरच तुटवडा भासणार आहे. करोनाच्या रुग्णांमुळेच नाही तर या आजाराच्या भीतीमुळेही या गोष्टींची मागणी वाढू शकते. त्यामुळे जगभरात या वस्तूंची कमतरता भासू शकते, असं राहुल गांधी शेअर केलेल्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. राहुल गांधीं पुढे म्हणतात, जेव्हा मोदींनी जनता कफ्युर्ची घोषणा केली होती, त्यानंतर दुसºयाच दिवशी केंद्र सरकारने मास्कच्या नियार्तीवर १९ मार्च रोजी बंदी घातली होती.
रविवारी जनता कर्फ्यू आणि त्यानंतर वैद्यकीय सेवकांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी टाळ्या आणि थाळ्या वाजविण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. कोरोनाच्या धास्तीमुळे भेदरलेल्या भारतीय नागरिकांचे मनोधर्य वाढले होते. मात्र,यावरही राहूल गांधी यांनी टीका केली होती. अडचणीचा सामना करणारी देशाची अर्थव्यवस्था कोरोनामुळे आणखी लयाला जाणार आहे. मध्यम स्वरुपातील उद्योग आर्थिक संकटामुळे बंद पडतील अशी भीती आहे. त्यामुळे नुसत्या टाळ्या आणि थाळ्या वाजून परिस्थिती सुधारणार नाही. आताच्या संकटाच्या परिस्थितीत जीव वाचविणे आणि कोरोनाचा प्रसार रोखणे हे पंतप्रधानांपासून संपूर्ण देशाच्या प्रशासकीय यंत्रणेचे पहिले प्राधान्य आहे. या वेळी त्यांना दिलासा देण्याचे सोडून अथर््व्यवस्थेचा मुद्दा काढून राहूल गांधी नागरिकांना भयभित करत आहेत, अशी टीका होत आहे.