• Download App
    कोरोनाच्या अंधाराला प्रकाशाच्या शक्तीने पराभूत करा : पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आवाहन; ५ एप्रिल रविवार रात्री ९.०० वाजता ९.०० मिनिटांचा प्रकाशसंकल्प...!! | The Focus India

    कोरोनाच्या अंधाराला प्रकाशाच्या शक्तीने पराभूत करा : पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आवाहन; ५ एप्रिल रविवार रात्री ९.०० वाजता ९.०० मिनिटांचा प्रकाशसंकल्प…!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : कोरोना लॉकडाऊनला आज ९ दिवस पूर्ण होत आहेत. आपण लॉकडाऊनला दिलेला प्रतिसाद अभूतपूर्व आहे. २२ मार्चला आपण थाळीनाद, टाळीनाद, घंटानाद करणे हे संपूर्ण जगासाठी हे आदर्श उदाहरण ठरले आहे. किती तरी देश भारताचे अनुकरण करत आहेत. २२ मार्चला आपण कोरोना युद्धवीरांप्रती आपण आभार व्यक्त केले. लॉकडाऊनची वेळ आपल्यावर आली पण आपण कोणीही एकटे पडलेलो नाही. कोरोना अ्ंधाराला आपणाला प्रकाशाच्या शक्तीने पराभूत करायचे आहे. देशाची सामूहिक शक्ती आपल्या बरोबर आहे. जनता जनार्दन ईश्वराचे रुप आहे. या लढाईत जनता रुपी ईश्वराचे स्मरण केले पाहिजे. यातूनच आपला मार्ग प्रशस्त होतो. कोरोना संकटामुळे गरीब सर्वाधिक ग्रस्त आहे. त्याला आपण पुढे आणले पाहिजे. कोरोना संकटाच्या अंधाराला ५ एप्रिलला कोरोनाला आव्हान द्यायचे आहे. १३० कोटी जनतेचा महासंकल्प करायचा आहे.

    ५ एप्रिल रविवारी रात्री ९.०० वाजता ९.०० मिनिटांपर्यंत घरातील लाइट बंद करून घरातील दरवाजावर किंवा बाल्कनीत मेणबत्ती, दिवा, टॉर्च किंवा मोबाईलचा फ्लँश लाइट लावा. प्रकाशाची अनुभूती घ्या. या प्रकाशात संकल्प करा, आपण एकटे नाही. १३० कोटी नागरिक एक संकल्प आहेत. कोठेही एकत्र येऊन हा कार्यक्रम करायचा नाही. सोशल डिस्टंसिंगची लक्ष्मण रेषा ओलांडू नका. घरातच रात्री ९.०० वाजता ९ मिनिटे हा कार्यक्रम करायचा आहे. आपल्या उत्साहापलिकडे कोणतीही शक्ती नाही. आपण एकटे नाही, १३० कोटी भारतीय एकजूट दाखवून कोरोनाला प्रकाशाची शक्ती दाखवा, असे आवाहन पंतप्रधानांनी केले.

    Related posts

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…

    राहुल गांधी म्हणतात, भारताची अर्थव्यवस्था resilient, production based बनवायला हवी, पण “तशी” अर्थव्यवस्था बनवायला कुणी अडवले होते??