राज्य सरकारने महापालिकेच्या कोरोना वॉरिअर्सचा शिल्लक असलेला निधी द्यावा या मागणीसाठी दिल्लीतील पालिका नेते दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरासमोर धरणे आंदोलन करत आहेत. यामध्येही महिलाही सहभागी आहेत. मात्र, केजरीवाल सरकारने या महिलांवर नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. हा खासगीपणाच्या अधिकाराचा भंग असल्याची तक्रार राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षांकडे करण्यात आली आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : राज्य सरकारने महापालिकेच्या कोरोना वॉरिअर्सचा शिल्लक असलेला निधी द्यावा या मागणीसाठी दिल्लीतील पालिका नेते दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरासमोर धरणे आंदोलन करत आहेत. यामध्येही महिलाही सहभागी आहेत. मात्र, केजरीवाल सरकारने या महिलांवर नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. हा खासगीपणाच्या अधिकाराचा भंग असल्याची तक्रार राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षांकडे करण्यात आली आहे.
BJP women leaders complain against CM Arvind Kajeriwal
दिल्ली भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षा योगिता सिंह यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्षा रेखा शर्मा यांची भेट घेतली. केजरीवाल यांच्याकडून खासगीपणाच्या अधिकाराचा भंग केला जात आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. या शिष्टमंडळात माजी महिला अध्यक्ष पूनम पराशर झा, प्रदेश प्रवक्ता पूजा सूरी, माजी स्थायी समिती अध्यक्षा शिखा राय, अनुभव भाद्वाज यांचा समावेश होता. रेखा शर्मा यांनी या मागणीची गंभीर दखळ घेऊन कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
योगिता सिंह यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर धरणे आंदोलन सुरू आहे. आठ दिवसांपासून शांततापूर्ण मार्गाने सुरू असलेल्या या आंदोलनात अनेक महिलाही सहभागी आहे. मात्र, त्यांच्यावर दबाव आणण्यासाठी केजरीवाल गैरमार्गाचा वापर करत आहे. महिलांच्या बसण्याच्या आणि झोपण्याच्या जागी कॅमेरे लावले आहेत. त्यामुळे या महिलांना संकोच वाटत आहे.
BJP women leaders complain against CM Arvind Kajeriwal
महिलांप्रति केजरीवाल यांचे क्षुद्र विचारही दिसतात असा आरोप करून योगिता सिंह म्हणाल्या महिला सुरक्षेबाबत मोठमोठे दावे करणाऱ्या केजरीवाल यांनी आंदोलनातील महिलांवर दबाव आणण्यासाठी त्यांच्यावर नजर ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यांच्यात थोडीही नैतिकता बाकी असेल तर महिला नेत्यांच्या खासगीपणाच्या अधिकारांचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांनी संपूर्ण देशातील महिलांची माफी मागावी.
दरम्यान, दिल्लीच्या तीनही महापालिकांच्या महापौरांनी मुख्यमंत्री निवासस्थानासमोरच आपले कार्यालय थाटले आहे. जोपर्यंत सरकारकडून महापालिकेची थकबाकी दिली जात नाही तोपर्यंत तेथूनच कार्यभार चालविण्याचा इशारा देण्यात आला आहे.