- हिज्बुलच्या नव्या कमांडरची सैन्य दलाच्या वरिष्ठांकडून खिल्ली
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : रियाज नायकूच्या खातम्यानंतर हिज्बुल मुजाहिदीनने काश्मीर ऑपरेशन्ससाठी सैफुल्ला मीर उर्फ गाझी हैदरची नियुक्ती केली आहे. पण भारतीय सैन्य दलाच्या वरिष्ठांनी त्याची पुरती खिल्ली उडविली आहे.
कितने गाझी आये; कितने गाझी गये, असे ट्विट करून लेफ्टनंट जनरल के. जे. एल. धिल्लन यांनी या गाझी हैदरचे पुढे काय होणार आहे, याची चुणूकच दाखवून दिली. सैफुल्ला मीर हा २६ वर्षांचा आहे. हिज्बुलच्या म्होरक्यांनी त्याचे नाव गाझी हैदर म्हणजे इस्लामचा शूर योद्धा असे ठेवले आहे. त्या नावावरूनच लेफ्टनंट जनरल धिल्लन यांनी त्याच्या नव्या नियुक्तीची खिल्ली उडविली आहे.
पुलवामाचा दुर्दैवी हल्ला झाला त्यावेळी लेफ्टनंट जनरल धिल्लन हे श्रीनगर कॉर्पसचे कमांडर होते. काश्मीरमधील अनेक यशस्वी ऑपरेशन्सचे नेतृत्व त्यांनी केले आहे. त्यांनी कितने गाझी आये; कितने गाझी गये, असे ट्विट करून सैफुल्ला मीरची जणू भविष्यवाणीच केली आहे.
Kitne Ghazi Aaye..
— KJS DHILLON (@Tiny_Dhillon) May 10, 2020
Kitne Ghazi Gaye…