• Download App
    कितने गाझी आये; कितने गाझी गये...!! | The Focus India

    कितने गाझी आये; कितने गाझी गये…!!

    • हिज्बुलच्या नव्या कमांडरची सैन्य दलाच्या वरिष्ठांकडून खिल्ली

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : रियाज नायकूच्या खातम्यानंतर हिज्बुल मुजाहिदीनने काश्मीर ऑपरेशन्ससाठी सैफुल्ला मीर उर्फ गाझी हैदरची नियुक्ती केली आहे. पण भारतीय सैन्य दलाच्या वरिष्ठांनी त्याची पुरती खिल्ली उडविली आहे.

    कितने गाझी आये; कितने गाझी गये, असे ट्विट करून लेफ्टनंट जनरल के. जे. एल. धिल्लन यांनी या गाझी हैदरचे पुढे काय होणार आहे, याची चुणूकच दाखवून दिली. सैफुल्ला मीर हा २६ वर्षांचा आहे. हिज्बुलच्या म्होरक्यांनी त्याचे नाव गाझी हैदर म्हणजे इस्लामचा शूर योद्धा असे ठेवले आहे. त्या नावावरूनच लेफ्टनंट जनरल धिल्लन यांनी त्याच्या नव्या नियुक्तीची खिल्ली उडविली आहे.

    पुलवामाचा दुर्दैवी हल्ला झाला त्यावेळी लेफ्टनंट जनरल धिल्लन हे श्रीनगर कॉर्पसचे कमांडर होते. काश्मीरमधील अनेक यशस्वी ऑपरेशन्सचे नेतृत्व त्यांनी केले आहे. त्यांनी कितने गाझी आये; कितने गाझी गये, असे ट्विट करून सैफुल्ला मीरची जणू भविष्यवाणीच केली आहे.

    Related posts

    भारताच्या लॉबिंग नंतर डोनाल्ड ट्रम्पची खरंच चुकीची कबुली की तात्पुरती उपरती??

    सत्ताधारी NDA खासदारांच्या कार्यशाळेत पंतप्रधान नरेंद्र मोदी बसले शेवटच्या रांगेत!!

    केलेल्या कामाच्या फडणवीसांच्या जाहिराती; पोस्टर वरच्या मुख्यमंत्र्यांना पोटदुखी!!