पंतप्रधानांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांशी व्हिडीओद्वारे संवाद साधताना आरोग्य सेतू नावाचे अॅप प्रत्येकाने डाऊनलोड करून घ्यावे असे आवाहन केले आहे. चीनी व्हायरसविरुध्दच्या लढाईसाठी महत्वाची भूमिका बजावू शकणारे हे अॅप आहे तरी काय?
विशेष प्रतिनिधी
पुणे : पंतप्रधानांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांशी व्हिडीओद्वारे संवाद साधताना आरोग्य सेतू नावाचे अॅप प्रत्येकाने डाऊनलोड करून घ्यावे असे आवाहन केले आहे. चीनी व्हायरसविरुध्दच्या लढाईसाठी महत्वाची भूमिका बजावू शकणारे हे अॅप आहे तरी काय?
चीनी व्हायरसविरुध्दची लढाई लढताना सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे माहिती आहे. आपल्या संपर्कातील कोणाला व्हायरसचा प्रादुर्भाव झशला आहे का हे समजणे महत्वाचे ठरते. त्यातूनच क्वारंटाईन होऊन आपल्यासोबत इतरांनाही प्रादुर्भावापासून वाचविता येऊ शकते. यासाठी नॅशनल इन्फॉरमॅटिक्स सेंटरकडून हे अॅप तयार करण्यात आले आहे. याद्वारे सरकार चीनी व्हायरसचा संसर्ग असलेल्या लोकांचे लोकेशन ट्रॅक करू शकणार आहे.
युजर्स रुग्णांच्या संपर्कात आहेत की नाही, याची माहिती घेऊ शकतील. अॅपमुळे कोविड-१९ संक्रमणाबाबत माहिती मिळणे सरकारला सोपे जाईल. लोकांना आरोग्य सेवेशी जोडता येईल. हे अॅप अँन्ड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. कोविड-१९ बाबतीतील माहिती आणि संरक्षणाचे उपायही सांगण्यात आले आहेत. तसंच नजीकच्या कोविड-१९ हेल्पसेंटरबाबतही माहिती देण्यात आली आहे. हे अॅप मराठी आणि हिंदी या भाषांसोबत ११ भाषांमध्ये उपलब्ध आहे.
आरोग्य सेतू अॅप युजर्सच्या स्मार्टफोनची लोकेशन ट्रॅक करतो. तसेच हे अॅप ब्लूटूथच्या माध्यमातून युजर्स करोना व्हायरस संसर्ग रुग्णांच्या संपर्कात आहे की नाही, हे तपासता येते. तसेच या दोघांमध्ये किती अंतर आहे, याची माहिती उघड होते. तसेच या अॅप्सवर कोविड १९ पासून कसे वाचू शकतो, या संदर्भात टिप्स मिळत राहते. आरोग्य सेतू मोबाइल अॅपमध्ये एक चॅटबॉक्स आहे. जो युजसंर्ना या व्हायरस संदर्भात सर्व प्रश्नांची उत्तरे देतो. तसेच युजर्समध्ये या व्हायरसची लक्षणे आहेत की नाही, हे सांगितले जाते. तसेच या अॅपमध्ये अनेक राज्यांची हेल्पलाइन नंबर्स आहेत.
कोणताही करोनाग्रस्त व्यक्ती जवळ आल्यास हे अॅप ट्रॅक करणार आहे. सहा फूट अंतरापर्यंत व्यक्तीला ट्रॅक केले जाऊ शकते. केंद्र सरकारकडे असलेल्या डेटाबेसचं अॅक्सेस या अॅपला मिळणार आहे. यात फोन क्रमांकाद्वारे रजिस्टर करावं लागणार आहे. त्यानंतर हे अॅप एक ओटीपी पाठवेल. त्यानंतर तुमचं नाव, वय अशा प्रकारची माहिती भरावी लागणार आहे. जोपर्यंत मोबाईलचं लोकेशन ट्रॅकिंग सुरू आहे तोवर हे अॅप ट्रॅक करत राहणार आहे. तसंच तुम्हाला फोनचं ब्ल्यूटूथही सुरू ठेवावं लागणार आहे. आरोग्य सेतु अॅपमध्ये दोन खास फीचर्स आहेत. यात राज्यवार कोविड-१९ हेल्पलाईन नंबर्सची लिस्ट दिली गेलीय. तसेच सेल्फ असेसमेंट या फिचरद्वारे आपण स्वत:ची चाचणी करू शकतो. यातून तुम्हाला कोरोनाचा धोका आहे की नाही हे लक्षात येण्यास मदत होते. जर तुमच्यामध्ये कोविड-१९ ची काही लक्षणे असतील तर हे अॅप तुम्हाला सेल्फ आयसोलेशनची सूचना येते