• Download App
    कांदा बाजारांच्या गावांमध्ये आढळले कोरोनाग्रस्त | The Focus India

    कांदा बाजारांच्या गावांमध्ये आढळले कोरोनाग्रस्त

    विशेष प्रतिनिधी

    नाशिक : जिल्ह्यातील मोठे कांदा बाजार असलेल्या लासलगाव आणि पिंपळगाव बसवंतमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.

    सल्याने लासलगाव व पिंपळगाव नजीक येथील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. नाशिक जिल्ह्याची सुरुवात ज्या लासलगाव शहरातून झाली त्याच शहरात पुन्हा एकदा दोन रुग्ण आढळल्याने प्रचंड खळबळ माजलेली आहे.

    लासलगाव येथील खाजगी रुग्णालयाचे एक डॉक्टर व याच रुग्णालयातील महिला परिचरिकेचा अहवाल मंगळवारी रात्री उशिरा प्राप्त झाला होता.या दोन्ही रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.मागील आठवड्यात देवरगाव येथील ४६ वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता.या रुग्णाने दोन दिवस लासलगाव येथील याच डॉक्टरांच्या रुग्णालयात उपचार घेतले होते,त्या रुग्णाचा संसर्ग या डॉक्टर व परिचरिकेस झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

    देवरगाव येथील करोनाबाधित रुग्णाला लक्षणे आढळून आल्यानंतर त्या रुग्णाची प्राथमिक तपासणी करणारे लासलगाव येथील या डॉक्टरांना हायरिस्क यादीत घेतले होते त्या नंतर आता लासलगाव व परिसरातील ५६ नागरिकांना हाय रिस्क म्हणून ताब्यात घेतले असून या सर्वांना भाऊसाहेब नगर येथील विशेष करोना कक्षात ठेवण्यात आले असल्याची माहिती निमगाव वाकडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ साहेबराव गावले यांनी दिली आहे.या पार्श्वभूमीवर मंगळवारी रात्रीपासूनच पोलिसांनी या परिसरात बंदोबस्त वाढविला असून अत्यावश्यक सेवांसह सह सर्व व्यवसाय बंद करण्यात आले आहे

    गेल्या काही दिवसांपासून ग्रामीण भागातील सिन्नर, चांदवड,येवला,विंचूर मनमाड येथील रुग्णसंख्येत वाढ होत आहे त्याशिवाय लासलगाव येथे २ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.ग्रामीण भागातही करोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे ग्रामीण भागात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.लासलगाव व परिसरात किराणा दुकान भाजीपाला हे पूर्ण बंद असल्याने सर्वत्र शुकशुकाट असून रस्त्यावर तुरळक वाहने वगळता अनावश्यक रस्त्यावर फिरणार्‍यांना पोलिसांनी काठीचा प्रसाद दिला.

    Related posts

    Slap on China : Operation Sindoor चे खोटे रिपोर्टिंग केल्याबद्दल चिनी सरकारी माध्यमे Xinhua आणि Global Times वर भारतात बंदी!!

    ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशानंतर, आज होणार केंद्रीय मंत्रिमंडळाची पहिली बैठक

    PM Modi : द फोकस एक्सप्लेनर : ऑपरेशन सिंदूरनंतर PM मोदी आदमपूरला का गेले? जाणून घ्या, पाकला घाम फोडणाऱ्या एअरबेसबद्दल