- शहराची रुग्ण संख्या १८२ वर
- ८४ रुग्णांचा अहवाल प्राप्त
- पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये ५ पेक्षा अधिक पोलीस कर्मचारी
विशेष प्रतिनिधी
मालेगाव : मालेगाव शहरात करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असून आज सायंकाळी प्राप्त अहवालानुसार ११ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. काल एकाच दिवशी ४४ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले होते.
आज एकूण ८४ अहवाल प्राप्त झाले असून यातील ७३ रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आला असून उर्वरित ११ रुग्ण पॉझिटिव्ह आहेत. शहरात करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १८२ वर गेली असून यातील १३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.