• Download App
    कंत्राटी परिचारिकांना ४५ हजारांऐवजी केवळ २५ हजार रुपयेच पगार | The Focus India

    कंत्राटी परिचारिकांना ४५ हजारांऐवजी केवळ २५ हजार रुपयेच पगार

    •  राज्यातल्या कंत्राटी परिचारिकांवर अन्याय करणारा आरोग्य विभागाने निर्णय घेतला आहे. त्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : राज्यातल्या कंत्राटी परिचारिकांवर अन्याय करणारा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. त्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. कोरोनाचे संकट आहे. जिवावर उदार होवून अनेक परिचारिका काम करत आहेत. असे असताना त्यांना आता ४५ हजाराऐवजी केवळ २५ हजार रुपयेच वेतन मिळणार असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे परिचारिकांमध्ये कमालीचा संताप आहे.

    आज जागतिक परिचारिका दिन. आरोग्य विभागातील डॉक्टरांसह सर्वच परिचारिका प्राण पणाला लावून कोरोनाशी लढत आहेत. कोरोनाने ग्रासलेल्या रुग्णांनाही मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यासाठी ही सर्व टीम झटत आहे. कंत्राटी अधिपरिचारिकाही जीवाची बाजी लावून काम करत आहेत.
    जागतिक परिचारिका दिन असलेल्या महिन्यापासूनच या आदेशाची अंमलबजावणी होत असल्याने  या सर्व नर्सेसमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे.

    रूग्णसेवेचं व्रत घेतलेल्या नर्सेस कोरोनाविरुद्धच्या लढ्यात नेटानं लढत आहेत. अशा परिस्थितीत कर्तव्य आणि वात्सल्य यांच्यातली तारेवरची कसरत लिलया साधत, आज असंख्य सेवाव्रती झटत आहेत. असे असताना आरोग्य मंत्रालयाने असा का निर्णय घेतला, याची चर्चा सर्वत्र होत आहे.

    Related posts

    साहेब खडे तो सरकार से बडे; पण सगळी राजकीय स्वप्नं धुळीस मिळे!!

    Vote chori : राहुल गांधींचा “हायड्रोजन बॉम्ब” आला; पण कोर्टाची पायरी चढायला घाबरला!!

    Modi @75 : रिटायरमेंटची चर्चा derail, मोदींसमोरच्या नव्या आव्हानांची चर्चा पुन्हा track वर!!