विशेष प्रतिनिधी
औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद शहरात ८०० जणांना कोरोना लागणीच्या संशयावरून होम क्वारंटाइन करून ठेवण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी दिली. शहरात फक्त एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे परंतु, काळजी घेण्याच्या दृष्टीने सुमारे ८०० जणांना होम क्वारंटाइनमध्ये राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यापैकी बहुतेकजण होस्टेलवर राहणारे विद्यार्थी आहेत. १७ परदेशी नागरिक आहेत. त्यांच्याशी संपर्क झाला आहे, अशी माहितीही डॉ. पाडळकर यांनी दिली.
कॉलेजमधील एक लेक्चरर कोरोना पॉझिटिव्ह आढळला. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. शहरातून परदेशात जाऊन आलेल्या ५८ जणांची ओळख पटवून त्यांनाही १४ दिवसांसाठी होम क्वारंटाइन करण्यात आले आहे.